Type Here to Get Search Results !

राहुरी - हिटरचा शाॅक लागून विवाहित तरुणी मयत.


 


हिटरचा शाॅक लागून विवाहित तरुणी मयत.


राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


पाणि तापवण्याच्या हिटरचा शाॅक लागून एक २८ वर्षीय विवाहित तरुणी मयत झाल्याची घटना काल दि. १५ डिसेंबर २०२४ सकाळी ६ वाजता राहुरी तालुक्यातील पिंपरी अवघड येथे घडली. 


आसमा कलीम पठाण, वय २८ वर्षे, ही विवाहित तरुणी तीच्या कुटुंबासह राहुरी तालुक्यातील पिंपरी अवघड येथे राहते. ती काल दि. १५ डिसेंबर २०२४ सकाळी ६ वा. नेहमी प्रमाणे ऊठून पाणि तापवण्यासाठी हिटर लावत होत्या. 


त्यावेळी त्यांना हिटरचा जबरदस्त शाॅक लागला आणि त्या जागेवरच बेशुद्ध पडल्या. त्यावेळी त्यांना तातडीने राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून उपचारा पुर्वीच मयत घोषित केले. 


या घटने बाबत राहुरी पोलिस ठाण्यात आकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एकनाथ आव्हाड हे करीत आहे. 


आसमा कलीम पठाण यांच्या पश्चात पती व चार मुले असा परिवार असून त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.