रस्त्याने मोटरसायकलवर बोलत चाललेल्या महिलेचा मोबाईल धुम स्टाईलने पळवीला.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
मोबाईलवर बोलत रस्त्याने जात असलेल्या महिलेच्या हाथातील मोबाईल मोटारसायकलवर दोन भामट्यांनी हिसकावुन धुम ठोकल्याची घटना राहुरी शहर हद्दीत दि. ४ डिसेंबर रोजी रात्रीच्या दरम्यान घडली.
भावना दिलीप लगडे, वय ३८ वर्षे, या राहुरी शहरातील मुलनमाथा परिसरात राहतात. दि. ४ डिसेंबर २०२४ रोजी रात्री ७.४५ वाजे दरम्यान त्यांच्या बहिणी बरोबर शनीचौक येथून मुलनमाथा येथे पायी जात होत्या. पायी चालत असताना भावना लगडे या मोटरसायकलवर बोलत रस्त्याने जात होत्या.
त्या पाच नंबर नाक्याच्या पुढे रस्त्याने जात असताना एका मोटारसायकलवर दोन भामटे आले. त्यांनी धुम स्टाईलने भावना लगडे यांच्या हाथातील मोबाईल जबरदस्तीने हिसकावुन धुम ठोकली.
घटने नंतर भावना दिलीप लगडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा रजि. नं. १२५८/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ११२ (१), ११२ (२), ३०४ (१), ३०४ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र या घटनेमुळे शहर परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
