आ. शिवाजीराव कर्डिले यांना मंत्रिमंडळात संधी द्यावी, कार्यकर्त्यांची मागणी.
भाजपा विधिमंडळ गटनेते पदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याने राहुरी येथे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या संपर्क कार्यालयासमोर भाजपा कार्यकर्त्यांनी फटाके फोडत आनंद व्यक्त केला. तसेच आ. शिवाजीराव कर्डिले यांना मंत्रिमंडळात संधी द्यावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली.
महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून आज देवेंद्र फडणवीस हे शपथ घेणार आहेत. भाजपा कोअर कमिटी व भाजपा नवनिर्वाचित आमदारांची बैठक होऊन या बैठकीमध्ये विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली. भाजपा कार्यकर्त्यांनी आ. कर्डिले यांच्या राहुरी येथील संपर्क कार्यालया समोर एकत्र येत फटाके फोडून व एकमेकांना मिठाई भरवत आनंद व्यक्त केला.
राहुरी मतदार संघामध्ये भाजपा शिवसेना राष्ट्रवादी आरपीआय व महायुतील सर्व घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करून राहुरी मतदार संघामध्ये आ. शिवाजीराव कर्डिले यांचा विजय सोयीस्कर केला. विधिमंडळ गटनेते पडते देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याने कार्यकर्ते उत्साहात असून आ. शिवाजीराव कर्डिले यांची मंत्रीपदी निवड करावी, अशी सर्व कार्यकर्त्यांची मागणी आहे. असे यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अमोल भनगडे यांनी सांगितले.
यावेळी रविंद्र म्हसे, चांगदेव भोंगळ, सयाजी श्रीराम, सचिन मेहत्रे, अनिल आढाव, राजेंद्र गोपाळे, सुकुमार पवार, राजेंद्र दरक, अक्षय तनपुरे, गणेश खैरे, आबासाहेब येवले मधुकर पोपळघट, किशोर येवले, उमेश शेळके, शरद येवले, जीशान शेख, अजित डावखर, ज्ञानेश्वर भिंगारदे, अनिल पवार, कुंडलिक गावडे, अशोक घाडगे, विजय जाधव, बाळासाहेब शिंदे, जगन्नाथ गोपाळे, सोमनाथ कोकडे, नितीन ढेरे, मारुती नालकर, कांतीलाल जगधने, जब्बार पठाण, बाबासाहेब शिंदे, समीर पठाण आदिसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
