सामाईक बांधावरील माती टाकल्याच्या कारणावरुन कचरु गांगुर्डे यांना काठी, लाथा बूक्क्यांनी मारहाण.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
सामाईक बांधावरील माती टाकल्याच्या कारणावरुन आरीपींनी कचरु गांगुर्डे यांना लाकडी काठी व लाथा बूक्क्यांनी मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची घटना राहुरी तालुक्यातील माहेगाव येथे दि. ३ डिसेंबर रोजी सायंकाळच्या दरम्यान घडली.
कचरु बाबुराव गागुर्डे, वय ६५ वर्षे, रा. माहेगाव, ता. राहुरी, यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, दि. ३ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ७.३० वाजे दरम्यान कचरु गांगुर्डे हे त्यांच्या शेतात काम करत होते. त्यावेळी आरोपी तेथे आले व म्हणाले कि, तु आपल्या सामाईक बांधावरील माती आमचेकडे का टाकली, असे म्हणुन आरोपींनी कचरु गांगुर्डे यांना लाकडी काठी व लाथा बूक्क्यांनी मारहाण केली.
तसेच शिवीगाळ करुन तुमच्याकडे पाहुन घेतो, अशी जिवे मारण्याची धमकी दिली आहे. घटनेनंतर कचरु बाबुराव गागुर्डे यांनी राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी चंदु पंढरीनाथ पवार, सुरेश पंढरीनाथ पवार, गोरख पंढरीनाथ पवार तसेच एक अनोळखी इसम सर्व रा. महाडुक सेंटर, माहेगाव, ता. राहुरी. यांच्यावर गुन्हा रजि. नं. १२५३/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ११५ (२), ११८ (१), ३ (५), ३५१ (२), ३५२ गुन्हा दाखल करण्यात आला.
