हाॅटेलचे बील वसूल करण्यासाठी मारहाण करुन खिशातील ५ हजार रुपए व सोन्याची चैन काढुन घेतली.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
हाॅटेलचे बील वसूल करण्यासाठी दिपक यांना शिवीगाळ करुन लाथा बूक्क्यांनी मारहाण करण्यात आली. तसेच त्यांच्या खिशातील रोख रक्कम काढून गळ्यातील सोन्याची चैन काढुन घेतली. ही घटना राहुरी शहर हद्दीत दि. ३ डिसेंबर रोजी रात्रीच्या दरम्यान घडली.
दिपक पाटीलबा म्हसे, वय ४१ वर्षे, रा. कोंढवड, ता. राहुरी, यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, या घटनेतील आरोपींनी दिपक म्हसे यांना दि. ३ डिसेंबर २०२४ रोजी रात्री ८.१५ वाजे दरम्यान फोन करुन राहुरी शहरातील ग्रीन हॉटेलमध्ये बोलावुन घेतले.
तेव्हा दिपक म्हसे हे ग्रीन हॉटेलमध्ये गेले असता आरोपी त्यांना म्हणाले कि, तुम्ही आमचे हॉटेलचे बील देउन टाका. तेव्हा दिपक म्हसे त्यांना म्हणाले की, माझेकडे पैसे नाहीत, त्यामुळे मी बील देणार नाही. असे म्हणालेचा त्यांना राग आल्याने आरोपींनी दिपक म्हसे यांना शिवीगाळ करुन लाथा बुक्यानी मारहान केली.
तसेच दिपक म्हसे यांच्या खिशातील पाच हजार रुपये व गळ्यातील एक तोळा वजनाची सोन्याची चैन बळजबरीने काढुन घेतली. आणि पुन्हा माझ्या नादी लागला तर तुम्हाला जिवे ठार मारुन टाकीन, अशी धमकी दिली. घटनेनंतर दिपक पाटीलबा म्हसे यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
त्या फिर्यादीवरून आरोपी ज्ञानेश्वर दत्तात्रय म्हसे, अशोक वसंत म्हसे, भीमराज अण्णासाहेब म्हसे, सर्व रा. कोंढवड, ता. राहुरी, या तिघांवर गुन्हा रजि. नं. १२५४/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ११५ (२), ११९ (१), ३ (५), ३५१ (२), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
