भामट्याने कपाटाचे लॉकर तोडुन सोन्या चांदीचे दागीने व रोख रक्कम पळवीली.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
अज्ञात भामट्यांनी घराचा पाठीमागील दरवाजा उघडुन घरात प्रवेश केला. त्यानंतर कपाटाचे लॉकर तोडुन त्यामधील सोन्या चांदीचे दागीने व रोख रक्कम पळवून नेल्याची घटना राहुरी शहर हद्दीत २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या दरम्यान उघडकीस आली.
वसीम वाजीदअली मन्सुरी, वय ३० वर्षे, रा. उत्तर प्रदेश, हल्ली रा. मुलनमाथा, राहुरी, हे दि. २८ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी कामावर गेला होता. दुपारी ३.३० वाजे दरम्यान त्यांची पत्नीने घराचे मागचा दरवाजाला आतुन कडी लावुन बंद केला. तसेच दरवाजवळील खिडकी व्यवस्थीत लावुन घराचे समोरचे दरवाजाला कुलुप लावुन बाजार करण्यासाठी गेल्या होत्या. त्या सायंकाळी ७.३० वाजे दरम्यान घरी परत आल्या.
त्यांनी घराचा समोरचा दरवाजा उघडुन घरात गेल्या. तेव्हा त्यांना घरातील कपाटाचा दरवाजा उघडा दिसला व कपाटातील सामनाची उचकापाचक झालेली होती. तसेच घराचा पाठीमागील दरवाजा व खिडकी उघडी दिसली. तसेच कपाटाचे लॉकर तोडुन त्यामधील एक तोळ्याचे सोन्याचे मणि मंगळसुत्र, ३० ग्रॅम वजनाच्या चांदीचे पायातील पैंजण व तीन हजार रुपए रोख रक्कम असा एकूण मुद्देमाल चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.
वसीम वाजीदअली मन्सुरी यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा रजि. नं. १२५१/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (ए), ३३१ (३), ३३१ (६) प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
