२ लाखांची मागणी करत विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ.
रात्री कोणाशी जास्तवेळ बोलता? नवऱ्याला जाब विचारल्याने पत्नीला चटके दिले.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
गहाण ठेवलेले दागिने सोडवण्यासाठी माहेरून २ लाख रुपए आणावेत. या मागणीसाठी विवाहीतेचा शारिरीक, मानसिक छळ करण्याचा प्रकार घडला असून रात्री जास्तवेळ कोणाशी बोलता ? असा नवऱ्याला जाब विचारला म्हणून विवाहीतेला चटके देण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
सौ. आशा संदीप वाडेकर, वय २८ वर्षे, रा. वरशिंदे, ता. राहुरी, ह. मु. उंबरे, ता. राहुरी या विवाहीतेने राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, २०१५ साली तीचा विवाह संदीप ठकाजी वाडेकर याच्या बरोबर झाला होता. लग्नानंतर एक मुलगी व एक मुलगा झाला आहे. २०२३ साली पतीने ट्रॅक्टर घेण्यासाठी आशा वाडेकर यांचे दागिने गहान ठेवले. गहान दागिने सोडवण्यासाठी तू तुझ्या माहेरून २ लाख रूपये घेवून ये, अशी सासरचे लोक सतत मागणी करत त्रास देवून शिवीगाळ करायचे.
तसेच तू घरात आल्यापासून कांद्याला भाव मिळत नाही, पैसे येत नाही, तुझा पायगुण चांगला नाही, असे म्हणून सासरचे लोक मारहाण करत. तू नीट काम करत नाही, तुला विहीरीत लोटून देऊ, अशी धमकी देवून शारिरीक, मानसिक छळ करत असत. ३ महिन्यां पूर्वी पती रात्री उशिरा पर्यंत फोनवर बोलत होता. त्यानंतर तो दोन-तीन दिवस घरी आला नाही. याबाबत विचारले असता पतीने आशा वाडेकर यांच्या हाताला चटके दिल्याचे फिर्यादीत म्हटले असून सासरच्या लोकांनी शारिरीक, मानसिक छळ केल्याच्या सदर महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संदीप ठकाजी वाडेकर, ठकाजी तुकाराम वाडेकर, जयवंती ठकाजी वाडेकर, अनिता राजेंद्र गावडे यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास राहुरी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
