जनजागृती द्वारे एड्सवर नियंत्रण शक्य डॉ.खिलारी
टाकळी ढोकेश्वर जनजागृती द्वारे एड्सवर नियंत्रण आणणे शक्य आहे असे प्रतिपादन सावली प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. भाऊसाहेब खिलारी यांनी केले जागतिक एड्स दिनानिमित्त सावली प्रतिष्ठान संचलित सावली स्कूल ऑफ नर्सिंग, ग्रामीण रुग्णालय तसेच श्री ढोकेश्वर महाविद्यालय टाकळी ढोकेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने या सामाजिक जनजागृती फेरीचे आयोजन केले होते. ही फेरी साई सावली हॉस्पिटल पासून बस स्टँड मराठी शाळा पारनेर चौक ते ग्रामीण रुग्णालय पर्यंत काढण्यात आली.यावेळी डॉक्टर भाऊसाहेब खिलारी म्हणाले की आज एड्स आजार विषयी लोकांमध्ये अनेक चुकीचे गैरसमज आहेत हा रोग संसर्गजन्य नाही त्यामुळे आजाराने ग्रस्त लोकांबरोबर जेवणे, खेळणे ,राहणे त्यांचे कपडे वापरणे याने रोगाची लागण होत नाही, काळजी घेणे हाच एड्सवर खरा उपचार आहे. हा आजार प्रामुख्याने एचआयव्ही बाधित व्यक्तीच्या लैंगिक संपर्कातून तसेच बाधित रक्तातून पसरला जातो .यासाठी आपण स्वतः जागृत होणे गरजेचे आहे .संयम व लैंगिक सुरक्षितता ठेवून एड्सचा प्रसार निश्चितपणे रोखता येईल. रॅलीद्वारे एड्स आजाराविषयी माहिती पत्रकांचे नागरिकांना वाटप करण्यात आले. विद्यार्थिनींनी पोस्टर व एड्स आजाराविषयी घोषणा देत लक्ष वेधले रॅलीमध्ये ग्रामीण रुग्णालयाचे समुपदेशक डॉक्टर वाळुंज सर यांनीही एड्स या आजाराविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या रॅली मध्ये सहभागी श्री ढोकेश्वर महाविद्यालयाचे उपप्राचार्य वीरेंद्र धनशेट्टी , प्रा. नामदेव वाल्हेकर , प्रा. लक्ष्मण कोठावळे, प्रा. संतोष कोकाटे , प्रा. शांता गडगे , प्रा. सुदाम वीर , प्रा.अमोल पायमोडे प्रा.श्रीकांत आल्हाट त्याचप्रमाणे सावली स्कूल ऑफ नर्सिंग च्या प्राचार्या शितल गर्कल , प्रा. नामदेव वाळुंज , प्रा. पुष्पा घुले , प्रा. वैशाली पानसरे आदी उपस्थित होते .

