Type Here to Get Search Results !

आंबेगाव - मंचर परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ ; एकाच सोसायटीत तिन ठिकाणी चोरी



मंचर परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ ; एकाच सोसायटीत तिन ठिकाणी चोरी

प्रतिनिधी - 

गेल्या काही दिवसात मंचर शहर व परिसरात चोरीच्या घटना वाढल्या असून चोरट्यांकडून बंद घरांची टेहळणी करुन फ्लॅट, घरांमध्ये चोरी केली जात आहे. 

मंचर ( ता. आंबेगाव ) गावचे हद्दीत एस कॉर्नर येथील लक्ष्मीपूजन सोसायटीच्या समोर विहा मेडिकलचे वर तिसऱ्या मजल्यावर असलेल्या लक्ष्मण अरुण दातखिळे यांच्या बंद फ्लॅटचा कडी कोंयडा तोडून घरात चोरी झाली आहे. अज्ञात चोरट्याने घरातील सोन्याचे मनी मंगळसूत्र, एक अंगठी, सोन्याचा हार, कानातील जोड, सोन्याची नथ असा एकूण २ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. सदर घटना दिनांक १/१२/२०२४ रात्री साडेनऊ ते दिनांक २/१२/२०२४ रोजी सकाळी सव्वानऊ वाजताच्या दरम्यान घडली आहे. याबाबत लक्ष्मण दातखिळे यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सब इन्स्पेक्टर यादव पुढील तपास करत आहे. तसेच याच सोसायटीत राहणारे राजू कोटेश्वर पवार, लालू कोटेश्वर पवार हे कामानिमित्त बाहेर गेले असता बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी फ्लॅट मधील कपाटातील, पेटीतील दागिने व रोख रक्कम चोरून नेऱ्याचीही घटना घडली आहे. एकाच सोसायटीत चोरीच्या ३ घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे मंचर पोलिसांनी रात्रीची गस्त घालावी चोरट्यांना जर बंद करावे अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ करत आहेत.