रस्त्यावर दुचाकी अडवून नातू व आजोबाला दगड, काठी व लाथा बूक्क्याने मारहाण.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
या रस्त्याने जायचे नाही, असे म्हणत तीघा जणांनी मिळून नातू व आजोबाला दगड, काठी व लाथा बूक्क्यांनी मारहाण केल्याची घटना दि. २ डिसेंबर २०२४ रोजी राहुरी तालुक्यातील कुक्कडवेढे येथे घडली.
कृष्णा विष्णु जवरे, वय २० वर्षे, रा. कुक्कडवेढे, ता. राहुरी या तरुणाने राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, कृष्णा जवरे, त्याचे आजोबा व पुतणी हे तिघेजण दि. २ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ४.३० वाजे दरम्यान त्यांच्या दुचाकीवरून वांबोरी येथून कुक्कढवेढे येथे शिवरस्तावरुन जात होते.
त्यावेळी शेटे वस्ती जवळ आरोपींनी त्यांची गाडी अडवून म्हणाले कि, तुम्ही ह्या रस्ताने जायचे नाही. तेव्हा कृष्णा जवरे त्यांना म्हणाला कि, हा रस्ता सरकारी आहे, तुम्ही आमचा रस्ता का आडवता. त्यावेळी आरोपींनी कृष्णा जवरे व त्याचे आजोबाला दगड, काठी व लाथा बूक्क्यांनी मारहाण केली. तसेच शिवीगाळ दमदाटी करुन पुन्हा ह्या रस्त्याने आले व आमच्या नादी लागले तर तुम्हाला जिवे ठार मारुन टाकु, अशी धमकी दिली.
घटने नंतर कृष्णा विष्णु जवरे या तरुणाच्या फिर्यादीवरून आरोपी सोपान रामदास शेटे, चांगदेव रामदास शेटे, बाळासाहेब बापुराव काचोळे, सर्व रा. कुक्कढवेढे, ता. राहुरी, या तिघांवर गुन्हा रजि. नं. १२४९/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ११५ (२), ११८ (१), १२६ (२), ३ (५), ३२४ (२), ३५१ (२), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
