पारनेरचे आरोग्यदूत उतरले मैदानात
खेळामुळे आरोग्य चांगले राहतेच पण सांघिक भावना वाढते या भावनेतून पारनेर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर्स एसोसिएशन व नगर मधील न्यूक्लियस हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांच्या सयुंक्त विद्यमाने पारनेर तालुक्यातील चारही झोन मधील डॉक्टरांसाठी पारनेर डॉक्टर प्रीमियर लीग चे काल साईदीप क्रिकेट अकैडमी,वाकोडी फाटा येथे आयोजन करण्यात आले होते .
यावेळी स्पर्धेचे उद्घाटक म्हणून पद्मश्री श्री पोपटराव पवार तसेच प्रमुख पाहुणे डॉ गोपाळ बहुरूपी पाटील उपस्थित होते तसेच पारनेर तालुक्यातील बहुसंख्य डॉक्टर उपस्थित होते .यावेळी श्री पवार यांनी मनोगत व्यक्त करताना ही तालुकास्तरीय बहुदा पहिलीच डॉक्टरांसाठीची स्पर्धा असावी असा विश्वास व्यक्त केला , संघटनेच्या सर्व सभासदांच्या एकीचे डॉ गोपाळ बहुरूपी यांनी कौतुक केले.सध्याच्या व्यावसायिक स्पर्धेच्या काळात पारनेर तालुक्यात सर्व वैद्यक व्यवसायिकांमध्ये असणारे परस्पर सामंजस्य कौतुकास्पद असल्याचा निर्वाळा त्यांनी केला.
चारही झोनमधील पारनेर टायगर्स ढोकेश्वर चॅलेंजर्स ,निघोज सुपरकिंग्स आणि भाळवणी वॉरियर्स यांच्यात चुरशीचे सामने पाहायला मिळाले,अंतिम सामना निघोज सुपरकिंग्स विरुद्ध ढोकेश्वर चॅलेंजर्स यांच्यात रंगला व निघोज संघाने बाजी मारत विजेतेपद संपादन केले तर ढोकेश्वर चॅलेंजर्स उपविजेता ठरला. डॉ अश्विन खंदारे मालिकावीर ठरले तर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून डॉ नितीन रांधवन तर उत्कृष्ट यष्टीरक्षक म्हणून डॉ सुनील कदम यांचा गौरव करण्यात आला तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरले डॉ सचिन साळे .न्युक्लियस हॉस्पिटलचे संचालक डॉ गोपाळ बहुरूपी यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले .
संघटनेचे अध्यक्ष डॉ भाऊसाहेब खिलारी ,सचिव डॉ संदीप तांबे ,उपाध्यक्ष डॉ सोमेश्वर आढाव व खजिनदार डॉ जितेंद्र खामकर व सर्व कार्यकारीणी सदस्य यांनी वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित करून आपल्या सहकाऱ्यांचे मानसिक व शारीरिक स्वास्थ्य चांगले राहावे यासाठी प्रयत्न केले. यावेळी महिला डॉक्टरांचा सहभाग देखील खुप मोठया प्रमाणात होता, सर्व झोनच्या महिला सदस्य उपस्थित राहून आपापल्या संघाला प्रोत्साहित करत होत्या, विविध संघांच्या सपोर्टर्सनी आपापल्या संघांना ढोल ताशा पिपाणी तसेच निरनिराळ्या वाद्यांचा वापर करून प्रोत्साहित केले. या संपूर्ण स्पर्धेचे चित्रीकरण व युट्युब लाईव्ह करण्यात आले होते अशा प्रसंगी सर्वांना मानसिक ताणतणावातून मुक्त असा एक दिवसाचा आनंद घेता आला. स्पर्धेचे उत्तम नियोजन करण्यासाठी डॉक्टर मनीष खरमाळे, डॉक्टर गणेश सांगळे ,डॉक्टर विशाल सुपेकर, डॉक्टर राहुल कांडेकर, डॉक्टर संदीप आवटी, डॉक्टर बाळासाहेब पठारे, डॉक्टर जयवंत निमसे, डॉक्टर विजय पुरी आदींनी कष्ट घेतले.अध्यक्ष डॉ भाऊसाहेब खिलारी यांनी आभार व्यक्त केले.
