बंद असलेल्या हाॅटेल मधून एकूण ५९ हजार रुपयांचा मुद्देमाल पळवीला.
खोलीचे कुलूप तोडून भामट्यांनी डि फ्रिज, टेबल, खुर्च्या व भांडे असा मुद्देमाल पळवीला.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
नगर मनमाड राज्य महामार्गावर राहुरी तालुक्यातील धामोरी बुद्रुक परिसरात बंद असलेल्या हाॅटेल मधील एका खोलीचे कुलूप तोडून अज्ञात भामट्यांनी तेथील डि फ्रिज, टेबल, खुर्च्या व भांडे असा एकूण ५९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना दि. ३० नोव्हेंबर रोजी सकाळी उघडकीस आली.
बाळासाहेब ताराचंद राठोड, वय ४७ वर्षे, रा. प्लॅट नं. बी ७०२ मॅग्नोलिया बिल्डींग, गुलमोहर रोड, सावेडी अहिल्यानगर, यांनी मार्च २०२३ मध्ये राहुरी तालुक्यातील धामोरी बुद्रुक परिसरात हॉटेल अल्ताफ हे हॉटेल मधील साहीत्यासह विकत घेतले आहे. सदर हॉटेल तेव्हा पासुन बंद स्थीतीत आहे. हॉटेल मध्ये दोन खोल्या असुन त्यांना कुलुप लावुन बंद ठेवले होते. सुमारे १५ दिवसांपुर्वी बाळासाहेब राठोड यांनी हॉटेलचे खोल्या उघडुन साफ सफाई करुन सामान व्यवस्थीत ठेवुन दरवाजाला कुलुप लावले होते.
दि. ३० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ११.४५ वाजेच्या सुमारास बाळासाहेब राठोड यांनी हॉटेलमध्ये जाऊन पाहिले असता हॉटेलच्या दोन खोल्या पैकी एका खोलीच्या दरवाजावरील कुलुप तोडलेले दिसुन आले. आणि तेथील डि फ्रिज, टेबल, खुर्च्या व भांडे असा एकूण ५९ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याचे लक्षात आले.
घटने नंतर बाळासाहेब ताराचंद राठोड यांनी राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा रजि. नं. १२४३/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ३३१ (४), ३३१ (३), ३०५ (ए) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
