Type Here to Get Search Results !

राहुरी - दोन दिवसात ७८ दुचाकीवर कारवाई, ४२ हजार रुपए दंड वसूल.


 


दोन दिवसात ७८ दुचाकीवर कारवाई, ४२ हजार रुपए दंड वसूल.


राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


राहुरी येथील पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलिस पथकाकडून शहरात दोन दिवसां पासून विशेष मोहीम राबवीली जात आहे. या मोहिमे दरम्यान विना नंबर व विना कागदपत्राच्या एकूण ७८ दुचाकीवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. 


राहुरी पोलिस ठाणे हद्दीतून चोरीस गेलेल्या दुचाकी गाड्यांचा शोध घेण्यासाठी पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन दिवसां पासून शहरात विशेष मोहीम राबवीली जात आहे. काल दि. १ डिसेंबर रोजी ३० दुचाकीवर कारवाई करून २० हजार ५०० रुपए दंड वसूल करण्यात आला. 


तसेच आज दि. २ डिसेंबर रोजी ४८ दुचाकीवर कारवाई करुन २१ हजार ५०० रुपए दंड वसूल करण्यात आला. यावेळी दोन्ही बाजूच्या नंबर प्लेट बसवून वाहने मूळ मालकांच्या ताब्यात देण्यात आली. 


दोन दिवस करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान एकूण ७८ दुचाकीवर कारवाई करून ४२ हजार रुपए दंड वसूल करण्यात आला. यावेळी १४ दुचाकी स्वारांनी कागदपत्र न दाखवील्यामुळे पोलिस पथकाने त्या दुचाकी त्यांच्या ताब्यात ठेवल्या आहेत. 


सदरची कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार, पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील, चारुदत्त खोंडे, समाधान फडोळ, सहाय्यक फौजदार तुळशीराम गिते, हवालदार हनुमंत आव्हाड, संदीप ठाणगे, संजय राठोड, बबन राठोड, बापू फुलमाळी, प्रमोद ढाकणे, सचिन ताजने, सतीश कु-हाडे, जालिंदर धायगुडे, जयदिप बडे, ठोंबरे, शिरसाट आदि पोलिस पथकाने केली.


राहुरी तालुक्यातील सर्व नागरिकांनी आपल्या दुचाकी व चार चाकी वाहनांवर पुढील व मागील दोन्ही नंबर प्लेट बसून घ्याव्यात. जेणेकरून विनाकारण दंड भरण्याची वेळ येणार नाही. असे आवाहन पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी केले आहे.