गृहरक्षक दलाचा ७८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा.
वर्धापन दिना निमित्त स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
पोलिस प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम करत असलेल्या गृहरक्षक (होमगार्ड) दलाचा ७८ व्या वर्धापन दिना निमित्त आज दि. १२ डिसेंबर २०२४ रोजी राहुरी येथील गृहरक्षक दल (होमगार्ड) पथकाचे वतीने ध्वजाचे ध्वजारोहण करून मानवंदना देण्यात आली.
गृहरक्षक दल (होमगार्ड) च्या स्थापने पासून समाजातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी गृहरक्षक दल (होमगार्ड) पोलिस प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे. या गृहरक्षक (होमगार्ड) दलाचा आज दि. १२ डिसेंबर २०२४ रोजी ७८ वा वर्धापन दिन राहुरी येथे ध्वजाला मानवंदना देऊन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी वर्धापन दिना निमित्त महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, होमगार्ड महानिदेशक विवेक श्रीवास्तव, गृहसचिव गोविंद मोहन, महासमादेशक महाराष्ट्र होमगार्ड रितेश कुमार, जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांचे शुभेच्छा संदेशांचे वाचन करण्यात आले.
वर्धापन दिना निमित्त गृहरक्षक दल (होमगार्ड) पथकातील पुरुष व महिला सदस्यांनी श्रमदान केले व पोलीस ठाणे जवळील श्रीदत्त मंदिर व परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे तसेच अधिकारी व कर्मचारी यांनी वर्धापन दिना निमित्त शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमासाठी राहुरी पथकाचे समादेशक अधिकारी आरिफ इनामदार, होमगार्ड सदस्य संजय औटी, सावित्रा तमनर, सतिष कुलथे, अशोक वाकचौरे, आदिनाथ ढोकणे, महेश म्हस्के, विजय जाधव, अजय प्रधान, अक्षय तनपुरे, शहाराम वराळे, पोपट मगर, चंद्रभान तमनर, यशवंत बाचकर, भरत नजन, गौतम खळेकर, भाऊसाहेब धनेधर, गणेश दांगट, महिला सदस्य अनिता लोखंडे, अरुणा सत्रे, शहाबाई पवार, लंका गायकवाड व इतर होमगार्ड सदस्य उपस्थित होते.
