Type Here to Get Search Results !

राहुरी - मोटारसायकलचा आवाज असा का आहे, असे म्हणून तरुणाला बेदम मारहाण.


 


मोटारसायकलचा आवाज असा का आहे, असे म्हणून तरुणाला बेदम मारहाण.


राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


तूझ्या मोटारसायकलचा आवाज असा का आहे, असे म्हणून तीघा जणांनी मिळून योगेश कातोरे या तरुणाला शिवीगाळ करत लाकडी दांडा व लाथा बूक्क्यांनी मारहाण केली. तसेच त्याच्या मोटारसायकलवर दगड टाकून नुकसान केले. ही घटना राहुरी शहरात दि. ३ डिसेंबर रोजी घडलीय. 


योगेश मच्छिद्र कातोरे, वय २० वर्षे, रा. क्रांती चौक, कातोरे गल्ली, राहुरी, हा तरुण दि. ३ डिसेंबर २०२४ रोजी २.३० वाजे दरम्यान त्याच्या मोटारसायकलवर राहुरी कॉलेजच्या पाठीमागील रस्ताने राहुरी कडे येत होता. तेव्हा आरोपीने त्याला रस्त्यात अडवून तुझ्या मोटारसायकलचा आवाज असा का आहे, अशी विचारणा केली. तेव्हा योगेश कातोरे म्हणाला कि, तो कंपनीचा सायलेंसर आहे. असे म्हणाल्याचा त्याला राग आल्याने आरोपींनी योगेश कातोरे याला लाकडी दांडा व लाथा बूक्क्याने मारहाण केली. आणि तु कोणाच्या नादी लागतो, तुला आम्ही संपवुन टाकु, अशी धमकी दिली. 


तसेच त्याच्या मोटारसायकलवर दगड टाकून तोडफोड केली. यावेळी योगेश कातोरे याचे वडिल घटनास्थळी गेले असता आरोपींनी त्यांना देखील शिवीगाळ दमदाटी केली. या घटनेत योगेश मच्छिद्र कातोरे हा गंभीर जखमी झाल्याने त्याने दोन दिवस अहिल्यानगर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार घेतल्या नंतर राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. 


त्या फिर्यादीवरून आरोपी विजय निलकंठ पवार, रा. राहुरी कॉलेज, राहुरी, तसेच त्याचे दोन अनोळखी मित्र अशा तिघा जणांवर गुन्हा रजि. नं. १२६५/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ११८ (१), ११५ (२), ३५१ (२), ३५२, ३२४ (४), ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.