कत्तलीच्या उद्देशाने आणून बेवारस सोडलेल्या जनावरांची गोशाळेत रवानगी.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
राहुरी शहरातील खाटीक गल्ली परिसरात कत्तलीच्या उद्देशाने आणून बेवारस सोडलेली पाच गोवंश वासरे पोलीस व नगरपालिका प्रशासनाने काल दि. २५ डिसेंबर रोजी ताब्यात घेऊन त्यांची रवानगी गोशाळेत केली आहे.
याबाबत राहुरी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार काल दिनांक २५ डिसेंबर २०२४ रोजी गुप्त बातमीदारां मार्फत बातमी मिळाली की, राहुरी शहरातील खाटीक गल्ली परिसरामध्ये गोवंश जातीचे मांस विक्री होत आहे. तसेच काही गोवंशीय जनावरे बांधून ठेवलेली आहेत.
सदर बातमी मिळाल्याने पो. नि. संजय ठेंगे यांनी पो.स.ई. धर्मराज पाटील, पो.हे.कॉ. सुरज गायकवाड, राहुल यादव, गणेश लिपणे, जयदीप बडे, जालिंदर धायगुडे यांना खात्री करण्यासाठी रवाना केले असता खाटीक गल्लीमध्ये कुठल्याही प्रकारचे गोमांस विक्रीसाठी आढळले नाही. परंतु त्या ठिकाणी पाच गोवंशिय वासरे बेवारस रित्या फिरताना आढळून आली.
त्यांच्या मालकीबाबत विचारपूस केली असता कुणीही उपयुक्त माहिती दिली नाही. त्यामुळे राहुरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांना कळवून त्यांनी स्वच्छता निरीक्षक राजेंद्र पवार, मुकादम सचिन वावरे, सफाई कामगार प्रसाद लाहुंडे, संतोष वावरे, सागर जगधने, सोमनाथ गायकवाड, निखिलेश वाघ यांना सदर ठिकाणी पाठवून गोवंशिय वासरे हे एका वाहनांमध्ये आणून त्या बाबत सविस्तर कारवाई करून सदर गोवंशिय वासरे गोशाळा येथे रवाना करण्यात आली आहे. सदर जनावरे कोणी आणि कशासाठी आणली होती? याबाबत पुढील तपास पो.नि. संजय ठेंगे यांचे मार्गदर्शना खाली तपास पथक करत आहे.
