नव्या वर्षात साई नामाचा गजर २ जानेवारीपासून साई पारायण व कीर्तन महोत्सव.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील श्री साई प्रतिष्ठाणच्या वतीने प्रतिवर्षा प्रमाणे नववर्षाच्या पहिल्या आठवड्यात गुरुवार दिनांक २ जानेवारी ते ९ जानेवारी दरम्यान श्री साई सच्चरित्र पारायण सोहळा व भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
गेल्या १० वर्षापासून श्री साई प्रतिष्ठान देवळाली प्रवरा व देवळाली ग्रामस्थांच्या वतीने महंत उद्धव महाराज मंडलिक यांच्या अधिपत्याखाली साई पारायण व कीर्तन महोत्सवचे आयोजन करण्यात येते. यंदाच्या ११ व्या साई उत्सवास २ जानेवारी रोजी होणार असून सांगता ९रोजी होणार आहे.
गुरुवार २ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता कलश पूजन व ग्रंथ पूजन होईल. त्यानंतर पारायण वाचनास सुरुवात होणार आहे. या या उत्सवानिमित्त सकाळी ४.३० वा, काकड आरती, सकाळी ८ ते १२ साई सच्चरित्र पारायण, माध्यन्ह आरती, सायंकाळी ४ वाजता हरिपाठ, सायंकाळी ६ वाजता धूप आरती भव्य कीर्तन महोत्सव ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत त्यानंतर शेज आरती व नंतर महाप्रसाद होईल.
पारायण व्यासपीठ चालक गणेश महाराज मुसमाडे हे आहेत. कीर्तन महोत्सव दरम्यान दररोज हजारो भाविकांना सकाळी नाश्ता व दुपारी व रात्री महाप्रसादाचे अन्नदात्यांच्या सहकार्याने आयोजन करण्यात आले आहे.
कीर्तन महोत्सवा निमित्त २ जानेवारी रोजी बाबानंद महाराज वीर, ३ जानेवारी रोजी गणेश महाराज वाघमारे (ओझरकर), ४ जानेवारी रोजी किशोर महाराज दिवटे (जालना), ५ जानेवारी रोजी आदिनाथ महाराज शास्त्री (तारकेश्वर गड), ६ जानेवारी रोजी ज्ञानेश्वर महाराज कदम (आळंदी), ७ जानेवारी रोजी देविदास महाराज म्हस्के (नेवासा), ८ जानेवारी रोजी पांडुरंग महाराज वावीकर यांचे कीर्तन होणार आहे. याच दिवशी दुपारी ४ वाजता ग्रंथ मिरवणूक व ६ वाजता दीप प्रज्वलन कार्यक्रम संपन्न होणार आहे.
९ जानेवारी रोजी सकाळी ९ ते ११ उद्धव महाराज मंडलिक (नेवासेकर) यांचे काल्याचे कीर्तन व त्यानंतर भव्य महाप्रसादाने उत्सवाची सांगता होणार आहे. तरी या पारायण सोहळ्यास व कीर्तन महोत्सवास आपण सर्वांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. असे आवाहन श्री साई प्रतिष्ठान व शहरवासीयांनी केले आहे.
