Type Here to Get Search Results !

पारनेर - "उद्यान पंडित" हा राज्यपालांकडून बहुमान मिळाविलेले राहुल रसाळ ठरले शेतकरी व उच्चशिक्षित तरुणांसाठी आदर्श


 


"उद्यान पंडित" हा राज्यपालांकडून बहुमान मिळाविलेले राहुल रसाळ ठरले शेतकरी व उच्चशिक्षित तरुणांसाठी आदर्श !

 कृषी क्षेत्रात नवनवीन कृषी तंत्रज्ञानाचा वापर करत रसाळ यांनी निघोज मध्ये घडविली कृषी क्रांती !

पारनेर- प्रतिनिधी

         निघोज येथील प्रगतशिल शेतकरी राहूल अमृता रसाळ यांनी आपापल्या शेतात आधुनिक व विविध प्रयोग करून कृषी क्रांती घडविल्याने त्यांचे शेतातील प्रयोग पाहण्यासाठी राज्यातून शेतकरी निघोज येथे मोठ्या प्रमाणावर येतात .

     राहूल रसाळ यांचे १० वी ची शिक्षण घेत असताना त्यांनी कुटुंबाला शेतातील कामांना हातभार लावण्यास सुरुवात केली . शेती करून बी एस सी ॲग्री पर्यंत शिक्षण घेतले . त्यावेळी त्यांच्या अडीच एकर शेतीत थॉमसन सीडलेस हिरव्या द्राक्षाची लागवड केली , पण या द्राक्षांना बाजारात मागणी कमी होत चालली होती , त्यांना समजले की , परदेशात लाल रंगाच्या द्राक्षांना मोठी मागणी आहे , त्यामुळे त्यांनी २००६ साली क्रिमसन या लाल रंगाच्या द्राक्षांची लागवड केली , २०१२ सालापर्यंत त्यांच्या या द्राक्षांना परदेशात खूप चांगला बाजार मिळाला . त्यांनी त्यांच्या शेतात केलेल्या आधुनिक प्रयोगामुळे प्रती एकर १० टन द्राक्ष उत्त्पन्न निघत असे , ही द्राक्षे प्रती किलो १२० ते १४० रुपये दरानी विकली गेल्याने त्यांना प्रती एकर १२ ते १४ लाख रुपये उत्पन्न मिळाले , तर कधी कधी मागणी वाढल्यावर १६ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले . सध्या १४ एकर शेतात द्राक्षांची बाग आहे , त्यामुळे कोट्यावधी रुपयांचे उत्पन्न शेतीतून मिळते . शिवाय द्राक्षवेलीच्या रांगेत कारले , पडवळ वा इतर भाजीपाल्याचे पिके आंतरभूत पद्धतीने घेतात , त्यामुळे घरचा वा पाहुणे रावळ्यांना वानवळा देण्याचे काम होवून जाते किंवा घर खर्च यावर भागविला जातो . तर आज त्यांच्या २५ एकर शेतात अतिशय सुंदर पद्धतीची डाळींब बाग डौलाने उभी आहे . डाळींबाला २०० रूपये किलो भाव मिळतो . तर ४ एकर शेतात पेरू बाग उभी आहे . पेरूला ही १०० रुपये किलो ने भाव मिळाला आहे .

प्रगतशिल शेतकरी राहूल रसाळ यांच्या कृषी तील या यशामागचे मुख्य कारण मातीचे मॅनेजमेंट , रेसिड्यू फ्री फार्मिंग व एक्सपोर्ट साठी असलेले ग्लोबल गॅप सर्टिफिकेशन आणि अपेड ग्रेपनेट रजिस्ट्रेशन आहे . रसाळ आपली संपूर्ण शेतीसाठी ही रासायनिक खतां ऐवजी जैविक खते , शेतातील कचऱ्यापासून तयार केलेली खते वापरतात . रासायनिक खतांच्या अति वापरामुळे शेती कालांतराने नापिक होती , पण जैविक , सेंद्रीय खते वापरून शेती विषमुक्त , पिकयुक्त होते , शेतीतील पिकांना अन्न म्हणून खतां इतकेच शुद्ध पाणी म्हणून क्षार युक्त पाण्याची गरज असते , अन्यथा शेती क्षारयुक्त पाण्याने नापीक होते , ही गरज ओळखून त्यांनी शेतीतील पिकांच्या पाण्यासाठी शेतात आर ओ प्लांट बसविला आहे . यामुळे उत्पादन खर्च कमी झाला आहे .

     ज्या शेतकऱ्याला आधुनिक पद्धतीने विषमुक्त व जास्त उत्पन्न घेणारी शेती करावयाचे आहे , त्यांनी प्रथम आपल्या शेतातील मातीचे  परीक्षण करून घेणे काळाची गरज आहे . कमीत कमी कष्टात व भांडवलात शेती करून जास्तीत जास्त उत्पन्न घ्यावयाचे असेल तर वैविध्यपूर्ण वआधुनिक तंत्रज्ञान वापरून शेती करणे , केव्हा ही फायदेशीर च , असा मोलाचा सल्ला निघोज येथील प्रगतशिल शेतकरी व विविध कृषी संस्था , कृषी विद्यापीठे , कृषी विभाग आणि राज्य शासनाने मानाचे पुरस्कार प्रदान करून सन्माननीत केलेले राहूल अमृता रसाळ यांनी दिला आहे .

     राहूल रसाळ यांचे वडील व राज्यात प्रसिद्ध असलेल्या श्री मळगंगा देवस्थान ट्रस्टचे कोषाध्यक्ष आणि राज्यातील रस्ते , पुल वा इतर मोठे कामे करणाऱ्या मळगंगा कन्स्ट्रक्शन चे संचालक अमृता रसाळ हे एक सालस व हुशार व्यक्तिमत्व म्हणून पारनेर तालुक्यात च नव्हे , जिल्ह्यात प्रसिद्ध आहेत .