Type Here to Get Search Results !

राहुरी - गबाळ पेटवल्याने बांधावरील झाडाला झळई लागली, असे म्हणुन आदिनाथ टिक्कल यांना मारहाण.


 


गबाळ पेटवल्याने बांधावरील झाडाला झळई लागली, असे म्हणुन आदिनाथ टिक्कल यांना मारहाण.


राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


तु कपाशीचे गबाळ पेटवल्याने आमचे बांधावरील झाडाला झळई लागली आहे, असे म्हणुन आरोपींनी आदिनाथ टिक्कल यांना शिवीगाळ दमदाटी करुन लाकडी दांडा, लोखंडी रॉड व लाथा बूक्क्यांनी मारहाण केली. ही घटना राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे दि. ४ डिसेंबर रोजी सायंकाळच्या दरम्यान घडली. 


आदिनाथ सर्जेराव टिक्कल, वय ४१ वर्षे, रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी, यांनी राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, दि. ४ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजेचे सुमारास आदिनाथ टिक्कल यांनी त्यांच्या घराच्या समोर कपाशीचे काढुन ठेवलेले गबाळ पेटविले. तेव्हा तेथे आरोपी आले व म्हणाले कि, तु कपाशीचे गबाळ पेटवल्याने आमचे बांधावरील झाडाला झळई लागली आहे.


असे म्हणुन आरोपींनी आदिनाथ टिक्कल यांना लाकडी दांडा, लोखंडी रॉड, स्क्रू ड्रायव्हर व लाथा बुक्क्याने मारहाण केली. तसेच आदिनाथ टिक्कल व त्यांच्या पत्नीला जिवे मारण्याची धमकी दिली. घटनेनंतर आदिनाथ सर्जेराव टिक्कल यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. 


त्या फिर्यादीवरून आरोपी राजेंद्र वेणुनाथ टिक्कल, अर्चना राजेंद्र टिक्कल, अक्षय राजेंद्र टिक्कल, संगीता विठ्ठल टिक्कल, सौरभ विठ्ठल टिक्कल, सर्व रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी, यांच्यावर गुन्हा रजि. नं. १२६४/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ११५ (२), ११८ (१), १८९ (२), १९०, १९१ (१), १९१ (३), ३५१ (२), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.