Type Here to Get Search Results !

पारनेर - शिक्षण क्षेत्रात मुंबईस्थित कार्यरत आसणाऱ्या पारनेरच्या भुमीपुत्राची गरुडझेप ! - भाऊसाहेब आहेर सर यांना साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर !


 


शिक्षण क्षेत्रात मुंबईस्थित कार्यरत आसणाऱ्या पारनेरच्या भुमीपुत्राची गरुडझेप !


भाऊसाहेब आहेर सर यांना साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर !


पारनेर प्रतिनिधी : श्रीकांत चौरे

           सामाजिक , राजकीय , धार्मिक तसेच शैक्षणिक क्षेत्रासह विविध क्षेत्रात पारनेर तालुक्याचे नाव देशभर पोचविणारे अनेक ज्ञानवंत ,गुणवंतांची खान म्हणून पारनेर तालुका ओळखला जातो .त्यापैकीच एक असणारे पारनेर तालुक्यातील भूमिपुत्र असणारे व शिक्षण क्षेत्रात मुंबई स्थित कार्यरत असणारे ,श्री भाऊसाहेब आहेर सर यांचे नाव घेता येईल .

              महापालिका माध्यमिक शिक्षक संघ मुंबई आणि सहकार मित्र सुरेश डावरे सहकारी  पतसंस्थेच्या वतीने सालाबाद प्रमाणे दिला जाणारा मानाचा साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार यावर्षी सेकंडरी स्कुल्स एम्प्लॉईस क्रेडिट सोसायटीचे संचालक व माध्यमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री .भाऊसाहेब आहेर सर याना जाहीर झाला असून , 2024 या वर्षाच्या अखेरीस म्हणजे 25 डिसेंबरला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते घाटकोपर येथील पाटीदार हॉल सभागृहात सुपूर्द केला जाणार आहे . श्री .आहेर हे गेली 30 वर्षे शैक्षणिक व सहकार क्षेत्रात काम करीत असून त्यांच्या कामाची दखल घेत वरील संस्थेने पुरस्कार जाहीर केला आहे . पुरस्कार जाहीर झाल्यानंतर नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके सह अनेक मित्र परिवार ,शैक्षणिक क्षेत्रासह सर्वच क्षेत्रातील हितचिंतक व मान्यवरांनी श्री.भाऊसाहेब आहेर सर यांचे अभिनंदन करत त्यांच्या भावी कार्यास शुभेच्छा दिल्या.