Type Here to Get Search Results !

पारनेर - आनंद एज्युकेशन फौंडेशनच्या प्रांगणात भरला बाल आनंद मेळावा




 आनंद एज्युकेशन फौंडेशनच्या प्रांगणात भरला बाल आनंद मेळावा

पारनेर प्रतिनिधी 

         आनंद मेडिकल अँड एज्युकेशनल फौडेशन पारनेर संचलित जिजामाता सेमी इंग्लिश स्कूल, चाटे किड्स स्कूल, राजीव गांधी सेमी इंग्लिश स्कूल, इंदिरा गांधी नर्सिंग स्कूल पारनेर येथे बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थी व पालकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.

     या बाल आनंद मेळाव्यासाठी अशोक कावरे, संस्थेचे सचिव डॉ सादिक राजे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून भास्कर तारडे, मारुती शेवाळे, चारही विभागांचे  मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते नारळ वाढवून या कार्यक्रमाला सुरुवात झाली. नर्सरी, ज्युनिअर केजी, सिनियर केजी च्या बालगोपालांनी भाजीपाला, फळे आणि खाद्यपदार्थाचे दुकाने लावून मेळाव्याची शोभा वाढवली तसेच जिजामाता विद्यालयातील विद्यार्थ्यांनी या आनंदमेळाव्यात सहभागी होऊन विविध प्रकारचे कडधान्य, पालेभाज्या, फळे, तसेच खाद्यपदार्थांमध्ये छोले भटोरे, मिसळपाव, पाणीपुरी, वडापाव, व्हेज पुलाव, पावभाजी, ओली भेळ इत्यादी त्याचप्रमाणे इतर पदार्थ विक्रीस आणले होते. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच पालकांनी देखील या विद्यार्थ्यांच्या बाल आनंद मिळवला चांगला प्रतिसाद दिला.


चौकट - 

विद्यार्थ्यांना शालेय ज्ञानाबरोबरच व्यावहारिक ज्ञान, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच व्यावहारिक ज्ञान प्राप्त करावे हे या बाल आनंद मेळाव्याचे उद्देश होते. तीन तास चाललेल्या या बाल आनंद मेळाव्याला बाजाराचे स्वरूप प्राप्त झाले होते. यामध्ये जवळपास १० ते  १२ हजार रुपयांची उलाढाल झाली. अशा रीतीने सर्व मान्यवर तसेच पालक शिक्षक वृंदांच्या मार्गदर्शने हा कार्यक्रम आनंदाने पार पाडला.


 डॉ. सादिक राजे (सचिव)