Type Here to Get Search Results !

राहुरी - आ. कर्डिले यांच्या हस्ते वांबोरी चारीला पाणि सोडण्यात आले.


 


आ. कर्डिले यांच्या हस्ते वांबोरी चारीला पाणि सोडण्यात आले.


राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून वांबोरी चारीसाठी आवश्यक ती तरतूद करून योजना सुरळीत चालण्यासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन आ. शिवाजीराव कर्डिले यांनी केले. मुळाधरण येथे मुळा धरणातून वांबोरी चारीला तसेच मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून आ. शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते पाणी सोडण्यात आले.


यावेळी आ. कर्डिले म्हणाले की, जिल्ह्यातील मंत्री म्हणून ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकतीच शपथ घेतली असून लवकरच ते पालकमंत्री होणार आहेत. जिल्ह्याच्या वाटचालीत नामदार विखेंचे योगदान असून ते मंत्री झाल्याने आपणच मंत्री झालो असे वाटत असल्याचे समाधान आहे. आपण आपण सातत्याने वांबोरी चारी च्या लाभ धारक शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळावे म्हणून प्रयत्नशील असून पाटबंधारे विभागाने वांबोरी चारी देखभाल दुरुस्ती करिता चौदा कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला. 


ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून त्यासाठी आवश्यक ती तरतूद करण्यासाठी आपण पुढाकार घेऊ. मागील काळात शेतकऱ्यांवर एकोणावीस टक्के वसुलीची जबाबदारी टाकण्यात आली होती व उर्वरित जबाबदारी शासनाने उचलली होती तरी देखील आज अखेर शेतकऱ्यांकडे सुमारे साडेपाच कोटी रुपयांची थकबाकी आहे. दरवर्षी साधारणतः ७० लाख रुपये वीज बिलासाठी भरणे अपेक्षित आहे. याबाबत मंत्री विखे यांच्या माध्यमातून थकबाकी भरण्यासाठी देखील तरतूद करण्यासाठी प्रयत्न करू, परंतु शेतकऱ्यांनी देखील योजना सुरळीत सुरू राहण्यासाठी सहकार्य करणे अपेक्षित आहे. 


यावेळी जेष्ठ नेते सुभाषराव पाटील म्हणाले की, वांबोरी चारीला सातत्याने ना राधाकृष्ण विखे पाटील व आ. शिवाजीराव कर्डिले यांनी सहकार्य केलेले असून शेतकऱ्यांना नेहमीच न्याय देण्याची भूमिका घेतलेली आहे. शेतकऱ्यांनी देखील आता सहकार्याची भावना ठेवावी व वांबोरी चारीच्या माध्यमातून टप्पा दोन सह उर्वरित कामे देखील लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे. 


याप्रसंगी बाळकृष्ण बानकर, माजी सभापती संभाजी पालवे, नगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब बोठे, उपसभापती रभाजी सुळ, तान्हाजी धसाळ, धनराज गाडे, हरिभाऊ कर्डिले, भाजपा तालुका अध्यक्ष सुरेश बानकर, शिवसेना तालुका अध्यक्ष देवेंद्र लांबे, अमोल भनगडे, सुरसिंग पवार, एकनाथ आटकर, रवींद्र म्हसे, माजी उपनगराध्यक्ष आर.आर.तनपुरे, कार्यकारी अभियंता सायली पाटील, दिपक कार्ले, शरद पेरणे, अशोक दहातोंडे, मंजाबापू घोरपडे, अशोक उंडे, कैलास पवार, हनुमंत घोरपडे, सोमनाथ हरेर, महेंद्र तांबे, बंडू पाठक, शिवाजी सागर, प्रभाकर हरिश्चंद्र, शिवाजी साठे, सुभाष निमसे, बाळासाहेब घोरपडे, मधुकर मगर आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गायकवाड यांनी केले.