Type Here to Get Search Results !

राहुरी - ख्रिस्त जन्मोत्सव सभा व समाज भूषण पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन.


 

ख्रिस्त जन्मोत्सव सभा व समाज भूषण पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन.


मा. मंत्री प्राजक्त तनपूरे यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सोहळ्याचे आयोजन.


राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


राहुरी येथे सामाजिक कार्यकर्ते पिंटूनाना साळवे यांच्या वतीने दि. २१ डिसेंबर रोजी नाताळ व नवीन वर्षा निमित्त ख्रिस्त जन्मोत्सव सभा व समाज भूषण पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 


२५ डिसेंबर रोजी नाताळ व १ जानेवारी रोजी असलेल्या नवीन वर्षा निमित्त राहुरी येथील सामाजिक कार्यकर्ते पिंटूनाना साळवे यांच्या वतीने दि. २१ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी सहा वाजता राहुरी शहरातील क्रांती चौक येथे ख्रिस्त जन्मोत्सव सभा व समाज भूषण पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 


यावेळी भविष्यवक्ता प्रोफेट मुन्ना यांचे व्याख्यान पार पडणार आहे. राहुरी तालुका पास्टर फेलोशिप, आराधना टीम (पा. रवि सरोदे), पा. दीपक थोरात, पा. अविनाश सरोदे यांचा आराधना गीतांचा कार्यक्रम होणार आहे.


या कार्यक्रमासाठी माजी मंत्री प्राजक्त तनपूरे, युवानेते हर्ष तनपूरे, राहुरी ता. मर्चंट पतसंस्था चेअरमन भारत भूजाडी, पास्टर गोरख दिवे, तहसीलदार नामदेव पाटील, पोलिस निरीक्षक संजय ठेंगे, नगरपरिषद चे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. 


या कार्यक्रमासाठी शहरातील जय भीम मित्र मंडळ यांचे सहकार्य लाभणार आहे. या कार्यक्रमात समाजात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींचा व पत्रकार बांधवांना समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते पिंटूनाना साळवे यांनी केले.