Type Here to Get Search Results !

पारनेर - ढोकेश्वर विद्यालयात बक्षीस वितरण समारंभ उत्साहात

 







ढोकेश्वर विद्यालयात बक्षीस  वितरण समारंभ उत्साहात


विविध स्पर्धा परीक्षांतून विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव मिळतो: सिताराम खिलारी

 टाकळी  ढोकेश्वर: पारनेर तालुक्यातील श्री ढोकेश्वर विद्यालयात विद्यालया अंतर्गत पार पडलेल्या विज्ञान- गणित  आणि लोकसंख्या शिक्षण प्रदर्शनाचे बक्षीस वितरण मोठ्या उत्साहात पार पडले त्यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलताना संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त सिताराम आण्णा खिलारी म्हणाले की आमचे विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांच्याही कठोर परिश्रम आणि चिकाटीने आजचा हा बक्षीस वितरण समारंभ  पार पडत आहे. विद्यालयात प्राचार्य सुनिल वाव्हळ आणि पर्यवेक्षक श्री शिवाजी सावंत  राबवीत असलेल्या विविध  उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव मिळतो.

   ढोकेश्वर विद्यालयात नोव्हेंबर महिन्यात विज्ञान - गणित, पर्यावरण आणि लोकसंख्या शिक्षण प्रदर्शन पार पडले होते यामध्ये  जवळपास  50 पेक्षा जास्त मॉडेल्स विद्यार्थ्यांनी तयार केले होते.  यामध्ये 5 वी ते 6 वी, 7वी ते 8 वी आणि 9 वी ते 12 वी असे गट करण्यात आले होते. 5 वी ते 6 वी गटात वैभवी कटारिया, आराध्या कडूस्कर, साई खराबी, पवन भद्रे, साहिल निवडुंगे,आयुष भांड यांच्या उपकरणास बक्षीस मिळाले.

7 वी ते 8 वी या गटात ओम थोपटे, गणेश  शेळके, मनस्वी झावरे, समृद्धी झावरे, समर्थ ठाणगे, साईराज रोकडे अथश्री ठुबे, तन्वी गोरडे,श्रद्धा ठाणगे, ऋतुजा गुंजाळ, रेहान अन्सार यांच्या उपकरणास पारितोषिक मिळाले. 9 वी ते 12 वी या गटात स्मित चव्हाण, आयुष ठुबे, श्लोका आडसूळ, समीक्षा खेडकर सेजल गायकवाड, सृष्टी पवार, मोहित राहींज   राजवर्धन धुमाळ या विद्यार्थ्यांच्या उपकारणास पारितोषिक मिळाले.

 या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक, रोख बक्षीस आणि बुके देऊन संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त सिताराम खिलारी सर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या प्रसंगी सर्व विज्ञान गणित शिक्षक आणि परीक्षण करणाऱ्या परीक्षकांचा देखील सन्मान करण्यात आला तसेच विद्यालयातील चित्रकला शिक्षक नारायण शेळके यांच्या चित्रांची निवड महाराष्ट्र राज्य चित्रकला प्रदर्शना साठी  झाली त्याबद्दल त्यांचाही सन्मान करण्यात  आला. या प्रसंगी प्राचार्य सुनिल वाव्हळ, पर्यवेक्षक शिवाजी सावंत, शास्र समन्वयक अशोक गांगड, बाळासाहेब निवडुंगे, शिवाजी नरसाळे, निलम खिलारी, वैशाली गायखे, सोनल  रोहकले, रवींद्र ज्योतिक इत्यादी शिक्षक आणि शिक्षकेत्तर  कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष इंगळे यांनी केले, प्रास्ताविक व अध्यक्षीय निवड प्रा. भाऊसाहेब हिंगडे यांनी केली तर आभार  बाळासाहेब निवडुंगे यांनी मानले.