Type Here to Get Search Results !

पारनेर - पारनेर वकील संघटनेच्या अध्यक्ष पदी अॅड. रवी हरकचंद गांधी तर उपाध्यक्ष पदी अॅड. रामेश्वरी उमेश औटी यांची बिनविरोध निवड तर सचिव पदी अॅड. अक्षय सुरेश देशमाने.




 



पारनेर वकील संघटनेच्या

अध्यक्ष पदी 

अॅड. रवी हरकचंद गांधी तर

उपाध्यक्ष पदी

अॅड. रामेश्वरी उमेश औटी यांची बिनविरोध निवड तर

सचिव पदी

अॅड. अक्षय सुरेश देशमाने.


पारनेर - प्रतिनिधी 


पारनेर वकील संघाची दिनांक ०२/१२/२०२४ रोजी जनरल मिटींग होवून सन २०२४- २०२५ करीता पारनेर वकील संघटनेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव या पदांची निवडणूक कार्यक्रम निश्चित करण्यात आला होता. त्यानुसार दिनांक ०२/१२/२०२४ ते दिनांक १९/१२/२०२४ पर्यंत सदर निवडीचा कार्यक्रम पुर्ण झालेला आहे.

सदर निवडणूकीत अध्यक्ष पदाकरीता १ अर्ज, उपाध्यक्ष पदाकरीता ३ अर्ज व सचिव (सक्रेटरी) पदाकरीता १ अर्ज प्राप्त झालेला होता. त्यापैकी उपाध्यक्ष पदाकरीता आलेल्या एकूण ३ अर्जामधुन अॅड. संजय तुकाराम गुंड व अॅड. मंगेश सुभाषराव औटी यांनी माघार घेतल्यामुळे सदर पारनेर वकील संघटनेची निवडणूक ही बिनविरोध झालेली आहे. त्यामध्ये अध्यक्ष पदी 

अॅड. रवी हरकचंद गांधी

उपाध्यक्ष पदी

अॅड. रामेश्वरी उमेश औटी

सचिव पदी

अॅड. अक्षय सुरेश देशमाने. 

  बिनविरोध निवडून आलेले आहेत.

या निवडणुकीत, निवडणुक अधिकारी म्हणून अॅड. शिंदे.आर.बी. यांनी व सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून अॅड. व्ही. बी. हराळ यांनी काम पाहिले .