Type Here to Get Search Results !

राहुरी - अल्पवयीन मुलीशी लग्न करून बालकाला जन्म, नवरदेव गजाआड.

 



अल्पवयीन मुलीशी लग्न करून बालकाला जन्म, नवरदेव गजाआड.

राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.

अल्पवयीन मुलीचे आरोपीशी लग्न लावून दिले व त्याने बळजबरीने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्यामुळे सदरच्या अल्पवयीन पीडित मुलीने नवजात बालकास जन्म दिल्याने राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत पीडितेने राहुरी पोलिसात फिर्याद दिली होती. त्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता.


या गुन्ह्यातील मुख्य आरोपी व त्याचे आई-वडील व सासू-सासरे यांनी सदर गुन्ह्यातील फिर्यादी पीडित अल्पवयीन मुलीचे आरोपीशी लग्न लावून दिले. तसेच सदर आरोपीने अल्पवयीन पीडित मुलगी फिर्यादी हिच्याशी जबरीने शारीरिक संबंध ठेवून तिला गरोदर ठेवले व नवजात बालकास जन्म दिल्याने सदरच्या गुन्ह्याची राहुरी पोलिसात फिर्याद नोंदविण्यात आली होती. 


गुन्ह्याच्या तपासात मुख्य आरोपीला राहुरी पोलिसांनी दि. ३० डिसेंबरला अटक करून त्याला राहुरी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्या आरोपीस पोलीस कोठडी सुनावली होती. अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे हे करत आहेत.


सर्व नागरिकांना याद्वारे आवाहन करण्यात येते की कोणीही आपल्या मुला अथवा मुलीचे लग्नाचे वय पूर्ण झाल्याशिवाय त्यांचा विवाह करू नये. अन्यथा त्यांच्यावर व लग्न जुळणारे आई-वडील सासू-सासरे यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. सर्व ग्रामपंचायत. पोलीस पाटील, ग्रामसेवक बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून आपापल्या क्षेत्रामध्ये जनजागृती करावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.


सदरची कारवाई पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक चारुदत्त खोंडे, पोलीस हवालदार सुरज गायकवाड, राहुल यादव, प्रमोद ढाकणे, सतीश कुऱ्हाडे, गोवर्धन कदम आदि पथकाने केली.