Type Here to Get Search Results !

राहुरी - हेल्मेट युक्त राहुरी, अपघात मुक्त राहुरी, अभियानाची मोटरसायकल रॅली द्वारे सुरुवात.

 हेल्मेट युक्त राहुरी, अपघात मुक्त राहुरी, अभियानाची मोटरसायकल रॅली द्वारे सुरुवात. 



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


रस्ता सुरक्षा सप्ताह व पोलीस वर्धापन दिनाचे औचित्य साधून उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंत कुमार जोशी व राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी सकाळी ११.३० वाजे दरम्यान मोटरसायकल रॅलीचे आयोजन केले होते. 


सदर रॅलीमध्ये परिवहन विभागाचे अधिकारी कर्मचारी पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी, पोलीस मित्र, विविध ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक, राहुरी तालुक्यातील नागरिक यांनी सहभाग नोंदवला. रॅली निघण्यापूर्वी रस्ते सुरक्षा व वाहतुकीचे नियमन या विषयी अनंत कुमार जोशी उप प्रादेशिक परिवहन विभाग अधिकारी श्रीरामपूर यांनी सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडले. 


पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी ट्राफिक जाम व रोडवरील अपघात होण्याच्या मूळ कारणाची कारण मीमांसा मांडली. देवळाली प्रवरा नगरपरिषद चे मुख्याधिकारी नवाळे यांनी सीट बेल्ट हेल्मेटचे महत्त्व अधोरेखित करत स्वतः शंभर टक्के सीट बेल्ट लावूनच प्रवास करणार असल्या बाबत संकल्प केला. 


अध्यक्षीय भाषणात राहुरीचे तहसीलदार नामदेव पाटील यांनी राहुरी तालुक्यात होणारे अपघात कमी होण्यासाठी सर्व प्रशासन कटिबद्ध राहून अपघाताची संख्या कमी करूया असा संकल्प केला. 


सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिवहन विभागाचे मोटर वेहिकल इन्स्पेक्टर पांडुरंग सांगळे, सचिन सानप धीरज भामरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. वैष्णवी मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक योगेश निकम व कस्तुरी मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे सचिन चोथे यांनी प्रमुख पाहुण्यांचे व उपस्थितांचे आभार मानले. 


उपरोक्त सर्व प्रमुख पाहुण्यांनी सदर मोटरसायकल रॅलीला हिरवी झेंडी दाखवत सुरुवात केली व त्यात सुमारे १०० दुचाकी स्वारांनी हेल्मेट परिधान करून सहभाग नोंदवला.


तसेच पोलीस मित्र संघटना महाराष्ट्रराज्य संस्थापक सचिन दिघे आणि त्यांचा सर्वस्टॉफ गुरुकुल इंग्लीश मिडीयम स्कुलचे सर्व ड्रायव्हर श्रद्धा इंग्लीश मिडीयम स्कुलचे ड्रायव्हर तसेच सर्व चालकांचे डोळे तपासणी शिबीर घेण्यात आले. श्रीरामपुर परिवहन विभागातर्फे चष्मा नंबर लागलेल्या चालकांना मोफत चष्मा वाटप करण्यात आले. आभार वैष्णवी ड्रायव्हींग स्कुलचे श्री सतिशचोथे यांनी मानले.