कोल्हापूर येथून पळवुन आणलेल्या मुलीचा शोध घेऊन आरोपीला ताब्यात घेतले.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
कोल्हापूर येथून पळवुन आणलेल्या अल्पवयीन मुलीची राहुरी पोलिसांनी केली सुटका तसेच आरोपीला गजाआड करण्यात आले. ही कारवाई ८ जानेवारी रोजी करण्यात आली.
राहुरी येथील आकाश पवार या तरूणाने कोल्हापूर येथील एका अल्पवयीन मुलीचे ३ जानेवारी २०२५ रोजी अपहरण करून राहुरी येथे आणले. या संदर्भात कोल्हापूर येथील हुपरी पोलीस ठाण्यात आकाश गोरक्षनाथ पवार, रा. पिंपरी अवघड, ता. राहुरी याच्यावर गुन्हा रजि. नं. १५/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १३७(२) प्रमाणे अपहरणचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्यात कोल्हापूर येथील पोलिस पथक पिडीत मुलीचा शोध घेण्यासाठी राहुरी येथे दाखल झाले. यावेळी राहुरी पोलिस पथकाने त्यांना मदत करण्या कामी राहुरी तालुक्यात आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. तसेच त्याच्या ताब्यातून पिडीत मुलीची सुटका केली.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ, पोलीस नाईक गणेश सानप व पोलीस हवालदार भाऊसाहेब शिरसाट यांनी केली.