Type Here to Get Search Results !

टाकळी ढोकेश्वर - ढोकेश्वर विद्यालयात मराठी पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा:


ढोकेश्वर विद्यालयात मराठी पत्रकार  दिन मोठ्या उत्साहात साजरा:


 टाकळी ढोकेश्वर: अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक  समाजाचे श्री ढोकेश्वर  माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मराठी पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात  आला. या प्रसंगी टाकळी ढोकेश्वर आणि परिसरातील  सर्व पत्रकार बांधवांचा संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त सन्मा. सिताराम आण्णा खिलारी  व प्राचार्य सुनिल वाव्हळ यांच्या हस्ते शाल, नारळ आणि बुके देऊन करण्यात आला. यामध्ये दैनिक लोकमतचे बबनराव गायके सर, तालुका प्रतिनिधी शरदराव झावरे, दैनिक पुढारी चे दादाभाऊ भालेकर, सी न्युजचे बाळासाहेब गायकवाड व श्रीनिवास शिंदे, दैनिक  अक्षरराज चे वसंतराव रांधवण,  पारनेर दर्शन चे संजय मोरे या सर्व पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार बबनराव गायके सर  यांनी लोकशाहीचे चार  स्तंभ त्यापैकी पत्रकारिता म्हणजे काय याविषयी मार्गदर्शन केले. 

 यावेळी विद्यालयाचे प्राचार्य सुनिल वाव्हळ सर, पर्यवेक्षक बाळासाहेब खिलारी,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव  डॉ. अजय ठुबे सर, प्रशांतजी तराळ, ज्येष्ठ शिक्षक बाळासाहेब निवडुंगे, मल्हारी वाघसकर, वैशाली गायखे, सोनल  रोहकले, निलम खिलारी, रवींद्र मते, रवींद्र ज्योतिक, नारायण शेळके, संदीप महांडुळे, सुरेखा  ठाणगे, प्रा. सचिन  महानवर, प्रा. पोपटराव जगदाळे, प्रिया डव्हणे, प्रा. अशोक वाघ, प्रा. राजेंद्र ढोणे, सुमन वाळुंज, अनिता म्हस्के, वैशाली ढोकळे, प्रा. विजय सोबले, प्रा. शिवाजी नरसाळे, कल्पना जाधव, सुशांत खेडकर, सोमनाथ  होरणे, अनुष्का कांबळे, विष्णू भद्रे, अमोल गोरे, नारायण  हरेल इत्यादी शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

 सूत्रसंचालन अतुल सैद यांनी केले, प्रास्ताविक व अध्यक्षीय निवड रवींद्र ज्योतिक यांनी केली तर आभार  मल्हारी वाघसकर  यांनी मानले.