अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेकंडरी टीचर को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड अहमदनगर च्या पारनेर शाखेच्या नूतन इमारतीचे पारनेर नगर मतदारसंघांचे नेते सुजित पाटील झावरे यांच्या शुभहस्ते उद्घाटन
अहिल्यानगर जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांची कामधेनू असलेल्या. अहमदनगर डिस्ट्रिक सेकंडरी टीचर को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या पारनेर शाखेच्या इमारतीचे उद्घाटन अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित पाटील झावरे यांच्या शुभहस्ते झाले. जिल्हा कार्यक्षेत्र असणारी व आठशे कोटी रुपयांची उलाढाल असणारी जिल्यातील माध्यमिक शिक्षकांच्या आर्थिक कामधेनू असणाऱ्या या इमारतीचे पारनेर शाखेचे नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा पारनेर येथे आज पार पडला.
माध्यमिक शिक्षकांना आर्थिक दृष्ट्या पाठबळ देणारी ही संस्था जिल्ह्यातील अग्रणी संस्था असून यापुढेही माध्यमिक शिक्षकांच्या प्रश्नांसाठी आपण सदैव उभे राहू असे प्रतिपादन यावेळी सुजित पाटील झावरे यांनी केले.
या वेळी संस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमन व त्यांचे सर्व सहकारी संचालक,अधिकारी, माध्यमिक शिक्षक संघटनेचे सर्व मान्यवर पदाधिकारी व माध्यमिक शिक्षक बांधव उपस्थित होते.