आंबेगाव - नायलॉन मांजामुळे दोनजण जखमी
राज्यासह देशभरात म
कर संक्रातीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात असून मकर संक्रांतीनिमित्त पतंग उडवण्याची परंपरा गेल्या अनेक दशकांपासून आहे मात्र पतंग उडवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या चिनी नायलॉन मांजामुळे अनेक गंभीर घटना घडल्या असून यावर्षीही राज्यात विविध ठिकाणी मांजामुळे दुर्दैवी घटना घडल्या असून अनेक नागरिक जखमी तर अनेकजण मृत्युमुखी पडले आहेत अशीच घटना आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे घडली असून नायलॉन मांजामुळे दोन तरुण जखमी झाले आहेत.
मंचर शहरातील काही इमारतीवरून पतंग उडवले जात होते यातील काही पतंग तुटून मंचर बस स्थानक परिसरात पुणे नाशिक महामार्गावर आल्याने पतंगाच्या नायलॉन मांजा गळ्यावर अडकून एक दुचाकी वर जाणारा तरुण जखमी झाला आहे. तर दुसऱ्या तरुणाच्या हातात मांजा गुतल्याने हाताच्या जखम झाली आहे. नायलॉन मांजा वर बंदी असतानाही मंचर परीसरात मांजा विक्री होत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.