Type Here to Get Search Results !

राहुरी - अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन अत्याचार करणाऱ्या आरोपीस १० वर्षाची सक्त मजुरी.

 


अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन अत्याचार करणाऱ्या आरोपीस १० वर्षाची सक्त मजुरी. 


राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलिस ठाणे हद्दीत दि. २० नोव्हेंबर २०२३ रोजी एक १६ वर्षीय मुलगी तीच्या लहान भावाला सोबत घेऊन शेतातून घरी जात होती. या दरम्यान त्यांचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर पिडीत मुलीवर बलात्कार करण्यात आला होता. या घटनेतील आरोपीला न्यायालयाकडून १० वर्षे सक्त मजूरीची शिक्षा सुनावण्यात आली. 


श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एक १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी व तीचा लहान भावासह दि. २० नोव्हेंबर २०२३ रोजी शेतातून घरी जाण्यास निघाली होती. या दरम्यान अज्ञात इसमाने त्यांचे अपहरण केल्याची घटना घडली होती. या घटने बाबत पिडीत मुलीच्या आईने बेलवंडी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात इसमा विरोधात भारतीय दंड विधान सहिता कलम ३६३ अन्वये अपहरणचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 


सदर गुन्ह्याचा तपास करत असताना तत्कालीन बेलवंडी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, तपासी अंमलदार राजेंद्र चाटे   यांनी सदर गुन्ह्याची तांत्रिक विश्लेषण करून सदर पीडितेस आरोपी कृष्णा उर्फ गणेश छबू माळी, वय २१ वर्षे, रा. आष्टी, जिल्हा बीड, याने माळशिरस तालुका सोलापूर येथे पळवून नेले असल्याचे निष्पन्न झाले. 


त्यावेळी दि. २५ नोव्हेंबर २०२५ रोजी पोलिस पथकाने माळशिरस येथे जाऊन पीडीत मुलगी व तीच्या भावाची सुटका केली. त्यानंतर पीडित मुलीचा सविस्तर जबाब नोंदवून तिच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचार बाबत भारतीय दंड विधान संहिता कलम ३७६ व लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ३, ४ अशी कलम वाढ करून आरोपीस अटक केले. 


आरोपी मजकूर याने पीडितेस व तिच्या भावास नवे कपडे घेऊन देतो, असे आमिष दाखवून पळवून नेऊन लैंगिक अत्याचार केले होते. तपासी अधिकारी यांनी आरोपी विरुद्ध सर्व तांत्रिक, भौतिक व जैविक पुरावे प्राप्त करून मान्य न्यायालयात विहित मुदतीत  दोषारोप पत्र पाठविलेले होते.


सदर खटल्यात श्रीगोंदा येथे सत्र न्यायालयात सत्र  न्यायाधीश मुजीब शेख यांनी आरोपीस भारतीय दंड विधान संहिता कलम ३७६ मध्ये १० वर्षे  सक्त मजुरीची शिक्षा व ३ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त शिक्षा. तसेच लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ३, ४ अन्वये १० वर्षे मजुरीचे शिक्षा व ३ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त शिक्षा, अशी शिक्षा ठोठावली. 


सदर खटल्यामध्ये अभियोग पक्षाच्या वतीने सरकारी वकील पुष्पा कापसे गायके यांनी बाजू मांडली. तर पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हवालदार सुजाता गायकवाड व आशा खामकर यांनी काम पाहिले.


सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उप विभागीय