Type Here to Get Search Results !

राहुरी - लालेसाहेब बालेसाहेब दर्ग्याचा यात्रोत्सव.

 



लालेसाहेब बालेसाहेब दर्ग्याचा यात्रोत्सव.

राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.

राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर गावातील सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान असलेले हजरत लालेसाहेब बालेसाहेब दर्ग्याचा यात्रोत्सव २० ते २२ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आल्याची माहिती तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शिवाजीराजे पवार यांनी दिली.

सालाबाद प्रमाणे हजरत लालेसाहेब बालेसाहेब दर्ग्याचा यात्रोत्सव (ऊरूस) निमित्त बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच प्रभाकर गाडे हे होते. याप्रसंगी २० जानेवारी रोजी संदल, २१ जानेवारी रोजी उरूस (छबिना) तर २२ जानेवारी जंगी हगाम्याच्या कुस्त्यांनी यात्रोत्सवाचा समारोप होणार असल्याची माहिती देण्यात आली. 

यात्रोत्सव समितीचे सचिव नबाब पटेल यांनी मागिल काळातील हिशोब मांडत यात्रोत्सवाचा लेखाजोखा सादर केला. पंढरीनाथ पवार, जालिंदर गाडे, श्रीराम गाडे, सोपान गाडे, हमीदभाई इनामदार, बंडू पहिलवान, सागर गाडे, नवाज देशमुख, हिरामण शिंदे, उपसरपंच संतोष शिंदे, आरीफ देशमुख, सेनेचे बाळासाहेब गाडे, रफिक इनामदार, रियाज देशमुख, किशोर कोहकडे, वसंत गाडे, युवराज गाडे, जुल्लूभाई पिरजादे, जगन्नाथ गोपाळे, संजय मोरे आदींनी चर्चेत सहभाग घेतला.

सर्व धर्मिय एकत्र येत गुण्या गोविंदाने हा उत्सव साजरा करतात. यंदाही संपूर्ण ग्रामस्थांच्या एकीने यात्रोत्सव साजरा केला जाणार आहे. दर्ग्याला आकर्षक विद्यूत रोषणाई, मिलाद पठण, छबिना चादर, संदर चादर मिरवणूक काढली जाते. दर्ग्याचे देखरेख करणारे नबाब पटेल, बाबा पटेल, मुन्शी पटेल यांच्या वतीने भांडारा आयोजित केला जातो. जमिरोद्दीन पिरजादे, आरफोद्दीन पिरजादे, अमजद पिरजादे, यासिन पिरजादे, असलम पिरजादे, मुन्ना पिरजादे, शरफोद्दीन पिरजादे, जाबू बाबा पिरजादे आदी पिरजादे कुटुंबियांकडून दुआ पठण होते. तसेच देवकर कुटुंबियाला नवैद्य मान दिला जातो.

याप्रसंगी वयोवृद्ध पहिलवान बाबूलाल शेख, बापू धनवडे, अशोक आंधळे, जालु आबा गाडे, बाबाभाई इनामदार, बशिर शेख, हबीबभाई देशमुख, निवृत्ती देशमुख, जालिंदर देशमुख, राजू शेख, तमीज पठाण, दगडू अंकल, विठ्ठल गाडे, जनार्दन कोहकडे, विजय बर्डे, चंदू बर्डे आदींची उपस्थिती होती.