सासरच्या लोकांकडून जावयाला बेदम मारहाण.
गाय विकलेले पैसे पत्नीला दिले नाही म्हणून लोखंडी टामी व लाथा बूक्क्यांनी मारहाण.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
गाय विकलेले पैसे पत्नीला दिले नाही म्हणून सासरच्या लोकांनी किरण मकासरे यांना शिवीगाळ करुन लोखंडी टामी व लाथा बूक्क्यांनी मारहाण केल्याची घटना राहुरी तालुक्यातील मानोरी येथे दि. ७ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास घडली.
किरण कारभारी मकासरे, वय ३० वर्षे, रा. मानोरी, ता. राहुरी, यांनी राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, किरण मकासरे यांनी दि. ७ जानेवारी २०२५ रोजी त्यांची जरशी गाय एका व्यापाऱ्याला ४१ हजार रुपयांना विकली होती. ते पैसे त्यांनी पत्नीला दिले नाही. दि. ९ जानेवारी २०२५ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास पत्नीने आपल्या माहेरच्या लोकांना बोलावुन घेतले.
त्यावेळी किरण मकासरे यांचे सासरे, सासू, मेव्हणा, मेव्हणी आदिंनी किरण मकासरे यांच्या घरी येऊन त्यांना म्हणाले कि, तू गाय विकुन आणलेले पैसे माझ्या मुलीला का नाही दिले, ते पैसे आताच्या आत्ता मला दे, असे म्हणुन आरोपींनी किरण मकासरे यांना शिवीगाळ करुन लोखंडी टामी व लाथा बूक्क्यांनी मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्या खिशातील ४१ हजार रुपए व मोबाईल काढुन घेतला.
किरण कारभारी मकासरे यांच्या फिर्यादीवरून आरोपी पत्नी- प्रिया किरण मकासरे, रा. मानोरी, ता. राहुरी, तसेच सासरे- किरण महादु कांबळे, मेव्हणा- विकी किरण कांबळे, मेव्हणी- स्विटी किरण कांबळे, सासु- ज्योती किरण कांबळे, सर्व रा. वॉर्ड नं. १ गोंधवणे, ता. राहुरी व तिन ते चार अनोळखी इसम यांच्यावर गुन्हा रजि. नं. १७/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३५२, ३५१ (२), १९१ (३), १९१ (१), १८९ (२), ११९ (१), ११८ (१), ११५ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.