Type Here to Get Search Results !

श्रीगोंदा - श्री.अनिल प्रभाकर कुलकर्णी यांचे पुणे येथे उपचारा दरम्यान निधन

 श्रीगोंदा येथील सेवा निवृत्त कृषी कार्यालयीन अधिक्षक श्री.अनिल प्रभाकर कुलकर्णी यांचे पुणे येथे उपचारा दरम्यान दि.20 जानेवारी रोजी निधन झाले.ते 76 वर्षांचे होते.त्यांच्या मागे दोन विवाहीत मुले,एक विवाहीत कन्या,पत्नी,दोन बंधु व एक बहिण असा परिवार आहे.एकत्र कुटूंब पद्धती समाजात दुर्मिळ होत असताना श्रीगोंद्यातील कुलकर्णी परिवाराचा आपले आईचे पश्चात ते मुख्य आधार होते.त्यांची पत्नी  विद्युत वितरण कंपनीतुन सेवानिवृत्त असुन एक बंधु जलसंपदा विभागात कार्यरत होते तर एक बंधु प्रसिद्ध विधीज्ञ आहेत.त्यांचे दोन्ही मुले महसूल विभागात तहसीलदार पदावर कार्यरत आहेत.



समाजातील विविध प्रश्नांबाबत ते 'सकाळ' वृत्त पत्रातुन लेखन करायचे.त्यांचे अंत्य संस्कार समयी समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी एक अजातशत्रु हरपल्याची हळहळ व्यक्त करून श्रद्धांजली अर्पण केली.