पोलीस स्थापना दिनानिमित्त आयोजित निबंध स्पर्धेतील विजेत्यांची घोषणा.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
राहुरी पोलीस स्टेशन मार्फत पोलीस स्थापना दिनाच्या निमित्ताने मोबाईल शाप की वरदान व रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या अनुषंगाने वाहतुकीचे नियम या विषयांवर निबंध स्पर्धा घेण्यात आलेल्या होत्या. तालुक्यातील सुमारे ३५० शाळांमध्ये गटविकास अधिकारी मुंडे, शिक्षणाधिकारी तुंबारे, नगरपरिषद मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांच्या समन्वयातून सुमारे १०,३०८ विद्यार्थ्यांची वाहतुकीचे नियम या विषयावर निबंध स्पर्धा घेतली होती.
सदर स्पर्धेत इयत्ता ५ वी ते ७ वी मध्ये प्रथम तीन व उत्तेजनार्थ एक अशा एकूण प्रथम चार विद्यार्थ्यांची नावे पुढील प्रमाणे १) गजेंद्र कैलास भाटी (प्रथम क्रमांक), आरोही इंग्लिश मेडीयम शाळा म्हैसगाव २) श्रावणी अनिल हिवाळे, (द्वितीय क्रमांक), जिल्हा परिषद शाळा कोंढवड
३)राजवर्धिनी विजय गाडे, (तृतीय क्रमांक), भगीरतीबाई कन्या विद्यालय राहुरी, ४) गौरी प्रदीप हरिश्चन्द्रे, उत्तेजनार्थ, शाहू विद्यालय खडांबे
तसेच इयत्ता ८ वी ते १० वी मध्ये १) भूमी अशोक खिलारी, (प्रथम क्रमांक), सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय २) श्रुती सुधाकर म्हसे, (द्वितीय क्रमांक), भागीरथीबाई कन्या विद्यालय राहुरी, ३) नियती दिपक ढगे, (तृतीय क्रमांक) मुळा व्हॅली पब्लिक स्कूल अग्रेवाडी, ४) सिद्धी कैलास जाधव, उत्तजनार्थ, नारायणगिरी महाराज विद्यालय मल्हारवाडी यांची निवड झाली असून विजयी विद्यार्थ्यांचा गौरव प्रजासत्ताक दिनाचे दिवशी केला जाणार आहे.
सदर स्पर्धा पैकी वाहतूक नियम या विषयावरील स्पर्धा रस्ता सुरक्षा सप्ताह चे औचित्य साधून माननीय पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनात राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात गटविकास अधिकारी मुंडे व गटशिक्षणाधिकारी तुंबारे, मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांच्या समन्वयातून घेण्यात आल्या.
स्पर्धेत तालुक्यात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव तहसीलदार नामदेवराव पाटील यांच्या हस्ते दिनांक २६ जानेवारी २०२५ रोजी राहुरी येथे करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक शाळेतून प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांचा त्यांच्या शाळेतील मुख्याध्यापकांच्या हस्ते आज दिनांक २० जानेवारी २०२५ रोजी गौरव करण्यात आला.