शहराच्या सुरक्षेसाठी शहरांसह उपनगरात सीसीटिव्ही कॅमेरे बसवा- दादापाटील सोनवणे.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
राहुरी शहरांसह उपनगर सध्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. शहराच्या आजूबाजूला व शहरात शाळा, काॅलेज, बसस्थानक या सारख्या सार्वजनिक ठिकाणी चोरी, हाणामारी या सारखे सातत्याने होत आहे. शाळकरी मुलींची छेडछाड करण्याचे प्रकार घडत असल्याने राहुरी शहरातील अनुसूचित प्रकाराला आळा घालण्यासाठी व शहर सुरक्षित ठेवण्यासाठी शहराच्या व उपनगराच्या मुख्य ठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी राहुरी नगर पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दादा पाटील सोनवणे यांनी केली आहे.
राज्यांचे जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील व राहुरी चे आमदार शिवाजीराव कर्डिले यांना पाठविलेल्या निवेदनात दादापाटील सोनवणे यांनी म्हटले आहे की, राहुरी शहरांसह उपनगरात मोबाईल चोरी मुलींची छेडछाड, महिलांचे दागिन्यांची चोरी या सारखें प्रकार सातत्याने होत आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या विद्यामंदिर प्रशाला, प्रगती विद्यालय, भागिरथी बाई तनपुरे विद्यालय, नुतन मराठी शाळा तसेच लहान मुलांच्या शाळा शहरांसह बाहेर गावाहून विद्यार्थी, विदृयाथीनी शिक्षणासाठी शहरात येत असतात. या परिसरात सी सी टि व्ही कॅमेरे बसविण्याची गरज आहे.
शहरातील नवी पेठ, शनि मंदिर, शिवाजी चौक, शुक्लेश्वर चौक, क्रांती चौक, कानिफनाथ चौक, बालाजी मंदिर चौक, राजमाता जिजाऊ चौक, बसस्थानक परिसर काॅलेज रोड या ठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. या परिसरात मोबाईल चोरी व्यापारी वर्गाच्या दुकानात चोरी या सारखें प्रकार घडत असतात. शहराच्या बाहेरील काॅलेज रोड, एकनाथ नगर, मुलनमाथा स्टेशन रोड, शाहू नगर कोर्ट परिसर बिरोबा नगर मल्हार वाडी रोड या ठिकाणी जेष्ठ नागरिक महिला सकाळ, संध्याकाळ फिरण्यासाठी जात असतात. याचा फायदा घेत चोर महिलांचे दागिन्यांची चोरी करण्याचें प्रकार होत आहे. यामुळे नागरिकांत भितीचे वातावरण तयार होत आहे.
राहुरी बसस्थानक परिसरात नागरिकांची मोठी वर्दळ असते. बाहेरगावाहून नागरिक दवाखाना, बॅक, तहसील आदि कामांसाठी दररोज येत असतात. या नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. शहरातील व्यापारी, मुलं, मुली, जेष्ठ नागरिक यांच्या सुरक्षिततेसाठी शहरातील व उपनगराच्या मुख्य ठिकाणी तसेच शहरातील बाजारपेठ सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्याची गरज निर्माण झाली आहे. शहरातील अनुसूचित प्रकाराला आळा घालण्यासाठी व शहर सुरक्षित ठेवण्यासाठी शहर सी सी टि व्ही कॅमेरे च्या नजरेखाली आणण्यासाठी मत्री ना राधाकृष्ण विखे पाटील व आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या कडे निधी उपलब्ध करून देण्याची मागणी सोनवणे यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.