साई आदर्श पतसंस्था व कपाळे परिवाराकडून स्त्री शक्तीचा सन्मान.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
साई आदर्श पतसंस्थेच्या चेअरमन संगिता कपाळे व परिवाराच्या माध्यमातून हळदी कुंकू उपक्रम राबवून स्त्री शक्तीचा सन्मान करून महिलांचा उत्साह वाढविला गेला असल्याचे प्रतिपादन राहुरी नगरपरिषद च्या माजी नगराध्यक्षा डॉ. उषाताई तनपुरे यांनी केले.
राहुरी फॅक्टरी येथील साई आदर्श पतसंस्थेच्या चेअरमन संगीता कपाळे यांच्या माध्यमातून मकरसंक्रांत निमित्ताने आयोजित हळदी कुंकू समारंभास महिलांना मोठा सहभाग नोंदविला. कपाळे परिवाराच्या वतीने दरवर्षी हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात येतो. यंदाही रविवारी सायंकाळी हळदी कुंकू संपन्न झाले.
यावेळी महिलांना वाण वाटप करण्यात आले. प्रसंगी डॉ. उषाताई तनपुरे बोलत होत्या. पुढे बोलताना डॉ. तनपुरे म्हणाल्या की, आज स्त्री अबला नसून सबला बनली आहे. स्त्री शक्तीचा सन्मान आजच्या युगात होणे आवश्यक आहे. साई आदर्श पतसंस्था माध्यमातून नेहमीच होतकरू तसेच निराधार महिलांना आधार देण्याचे कार्य चेअरमन संगीता कपाळे यांच्या माध्यमातून सुरू आहे.
यावेळी देवळाली नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा ज्योतीताई त्रिभुवन, माजी नगरसेविका सुजाता कदम, अनुजा कदम, जयश्री पांगरे, पुष्पा आंधळकर, वैष्णवी दुगानी, ज्योतिताई कडू, ॲड. सविता ठाणगे, दर्शना ताथेड, सारिका कदम, प्रियांका कदम, डॉ. कांचन शेकोकर, कविता जेजुरकर, श्वेता विजन, भारती चोरडिया, दीपा लोढा, भारती गोपाळे, विद्या राऊत, स्वाती आंबिलवादे, ममता छाजेड, रोहिणी कराड, डॉ. तनुजा छाजेड, पूजा छाजेड, सुजाता घुगरकर, सोनाली विजन, दीपाली विजन आदींसह परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी साई आदर्श पतसंस्थेच्या चेअरमन संगीता कपाळे, चैताली कपाळे, नयन कपाळे यांनी परिश्रम घेतले.