सावली स्कूल ऑफ नर्सिंगची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम
- पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सावली प्रतिष्ठान संचालित सावली स्कूल ऑफ नर्सिंगच्या आर.ए.एन.एम प्रथम वर्ष या कोर्स चा या वर्षाचा निकाल शंभर टक्के लागला आहे. या कॉलेज ची १००% निकालाची परंपरा सलग 15व्या वर्षीही कायम राहिली आहे. यावर्षी या कॉलेज मधील शेख अलिशा हिने 82.33% गुणांसह प्रथम क्रमांक तसेच थोरात बेबी 80.55%द्वितीय क्रमांक व मीरा मुंढे हिने 79.33%मिळवून तृतीय क्रमांक मिळवला. दरवर्षी कॉलेज मार्फत एड्स जनजागृती फेरी , रक्तदान शिबिरे, सर्वरोग निदान शिबीर, पथनाट्ये, अशा प्रकारची उपक्रम तसेच साई सावली मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल या ग्रामीण भागातील सुसज्ज हॉस्पिटल येथे मुलीना प्रक्टिस दिली जात असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ. भाऊसाहेब सीताराम खिलारी यांनी दिली. या सर्व विद्यार्थीनीना प्राचार्य सुशांत शिंदे, प्रा. नामदेव वाळूंज, प्रा.पानसरे वैशाली, प्रा. शितल गर्कल, प्रा. पुष्पा घुले यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व गुणवंत विद्यार्थिनींचे अध्यक्ष डॉ. भाऊसाहेब खिलारी, डॉ.अश्विन खंदारे, डॉ, स्वाती खिलारी , संस्थेचे उपाध्यक्ष प्रताप खिलारी, सचिव संतोष सोनावळे, संदीप खिलारी, नितीन आंधळे, प्रसाद सोनावळे, गणेश चव्हाण तसेच साई सावली हॉस्पिटल च्या सर्व कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले.