Type Here to Get Search Results !

राहुरी - अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारा तरुण गजाआड.

 अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारा तरुण गजाआड.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


राहुरी तालुक्यातील म्हैसगाव परिसरातून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आले होते. या घटनेतील आरोपीच्या राहुरी पोलिस पथकाने मुसक्या आवळून ताब्यात घेतले. तसेच त्याच्या तावडीतून मुलाची सुटका करण्यात आली. 


या घटनेतील १५ वर्षे ८ महिने वय असलेली अल्पवयीन मुलगी तीच्या कुटुंबासह राहुरी तालुक्यातील म्हैसगाव परिसरात राहते. दि. २ जानेवारी २०२५ रोजी दुपारी ४ वाजे दरम्यान सदर मुलगी घरात कोणाला काही न सांगता बाहेर गेली होती. त्यावेळी तीचे अपहरण करण्यात आले होते. तीच्या आईने राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा रजि. नं. ८/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १३७ (२), ८७ प्रमाणे अपहरणचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 


पोलिस पथकाला आरोपीचा सुगावा लागताच पथकाने सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये यातील पीडिता मुलगी तसेच आरोपी यांचा शोध घेतला. आणि आरोपी अनिकेत नाना विधाटे, रा. म्हैसगाव, ता. राहुरी, याला ८ जानेवारी २०२५ रोजी ताब्यात घेऊन गजाआड केले. तसेच त्याच्या ताब्यातून पिडीत अल्पवयीन मुलीची सुटका केली. 


सदरची कारवाई पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांचे नेतृत्वात पोलीस उप निरीक्षक समाधान फडोळ, लेखनिक रवींद्र कांबळे, पोलीस हवालदार रामनाथ सानप, जानकीराम खेमनर, अविनाश दुधाडे आदि पथकाने केली.