Type Here to Get Search Results !

पारनेर - टाकळीढोकेश्वर येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आंतर विभागीय सायकलिंग रोड रेस-मुले व मुली स्पर्धा संपन्न

 पारनेर तालुक्यातील टाकळीढोकेश्वर येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आंतर विभागीय सायकलिंग रोड रेस-मुले व मुली स्पर्धा संपन्न



श्री ढोकेश्वर कॉलेज, टाकळी ढोकेश्वर ता. पारनेर व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे याच्या संयुक्त विद्यमाने आंतर विभागीय सायकलिंग रोड रेस-मुले व मुली स्पर्धा श्री ढोकेश्वर कॉलेज, टाकळी ढोकेश्वर ता. पारनेर जि. अहिल्यानगर येथे आयोजित केल्या होत्या या स्पर्धेमध्ये पुणे शहर, नाशिक, अहिल्यानगर, पुणे जिल्हा असे चार विभागाचे मुले व मुलींचे संघ सहभागी झाले होते या स्पर्धेचे उदघाटन मा. डॉ भाऊसाहेब खिलारी सदस्य, अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज, अहमदनगर यांच्या शुभहस्ते झाले त्यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना सागितले कि खेळ आपल्या जीवनात अतिशय महत्वाचा आहे खेळामुळे शाररीक व मानसिक सुद्रुढता वाढण्यास मदत होते तसेच नियमितपणे व्यायाम व सराव केला तर आपल्याला यश हे निश्चीतच मिळेल या संदर्भात खेळाडूंना मार्गदर्शन केले व फ्लॅग ओपन करून स्पर्धेचे उद्घाटन केले तसेच सावत्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे क्रीडा विभाग कक्षाधिकारी मा. शिवाजीराव उत्तेकर यांनी देखिल खेळाडूंना मार्गदर्शन करताना सांगितले कि या स्पर्धेसाठी आलेले सर्व मुले व मुली हे अतिशय सराव व परिश्रम घेऊन या स्पर्धेसाठी आलेले आहेत या स्पर्धेतुन सावत्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला चागंला संघ मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करून सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. प्राचार्य डॉ आर. के आहेर यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना प्रथम सर्व उपस्तीत मान्यवराचे स्वागत केले व खेळाडूंना सागितले कि मन, मेदू, मनगट सशक्त राहण्यसाठी खेळ जीवनात अतिशय महत्वाचा व अविभाज्य घटक आहे त्यामध्ये परिश्रम घ्या यश तुम्हाला निश्चीतच मिळेल या संदर्भात खेळाडूंना मार्गदर्शन केले व स्पर्धेसाठी सर्व खेळाडूंना शुभेच्या दिल्या. या स्पर्धेसाठी महाविद्यालययाचे क्रीडा विभाग प्रमुख डॉ शांताराम साळवे सयोजन सचिव म्हणून स्पर्धेचे उत्तम प्रकारे नियोजन केले होते या प्रसंगी विविध विभागातील क्रीडा संचालक उपस्तीत होते त्यामध्ये डॉ. शरद मगर अहिल्यानगर डॉ. लोहोटे. पी. के पुणे ग्रामीण प्रा. राहुल निकम पुणे शहर प्रा. दादा लोखंडे अहिल्यानगर प्रा. शिंदे ए.एस पुणे ग्रामीण प्रा. चंद्रशेखर मोरे नाशिक प्रा.वडणे.आर.डी. नाशिक तसेच निवड समिती सदस्य डॉ. प्रतिमा लोणारे राजगुरुनगर डॉ. लहानू जाधव नाशिक प्रा. नामदेव बन्ने पुणे आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शांता गडगे यांनी केले व डॉ. विजय सुरोशी यांनी सर्वाचे आभार मानले.