Type Here to Get Search Results !

पारनेर - जखणगांव ता नगर येथे कॅन्सर निदान व उपचार शिबिर यशस्वी.

 आरोग्य ग्राम जखणगांव ता नगर येथे कॅन्सर निदान व उपचार शिबिर यशस्वी.

१५ ऑगस्ट २५ पर्यंत जखणगांव हे संपूर्ण आरोग्य ग्राम करण्याचा गावकऱ्यांनी केला निर्धार.



आरोग्यदायी गांव म्हणून राज्यात ओळखल्या जाणाऱ्या नगर तालुक्यातील जखणगांव येथे मोफत कॅन्सर निदान व उपचार शिबिर नुकतेच संपन्न झाले.

डॉ गरूड हॉस्पीटल व कॅन्सर सेंटर मार्फत, ग्रामपंचायत कार्यालय जखणगांव व प्राथमिक आरोग्य केंद्र टाकळी खादगांव यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.

यावेळी उपस्थित गावकरी व रूग्णांना डॉ पद्मजा गरूड, डॉ किर्ती गंधे, डॉ प्रकाश गरूड, डॉ ॠषाली झावरे, डॉ सुनील गंधे यांनी मार्गदर्शन केले.

या निमित्ताने आयोजित महिला मेळाव्यात मकरसंक्रांतीप्रित्यर्थ हळदीकुंकू कार्यक्रम झाला.यामध्ये सर्व उपस्थित महिलांना आरोग्य उपकेंद्र जखणगांव व डॉ गरूड हॉस्पीटल मार्फत वाण वाटण्यात आले.

आवश्यक रूग्णांची सोनोग्राफी डॉ पद्मजा गरूड यांच्या मार्फत मोफत करण्यात येणार आहे.

१५ ऑगस्ट २५ पर्यंत अथक प्रयत्न करून जखणगांव हे राज्यातील पहिले संपूर्ण आरोग्य ग्राम करण्याचा निर्धार यावेळी आरोग्य विभागाचे कर्मचारी व ग्रामस्थांनी केला.

हे शिबिर यशस्वी करण्यासाठी

 डॉ समृद्धी नेटके,निर्मला सोनवणे,

 श्री सदाशिव गायकवाड 

 श्री नवनाथ भानगुडे अशोक ढगे, सुनिता कर्डिले, रूपाली चाबुकस्वार,अशोक पालवे, परिचारिका गाडेकर, रोहिणी दरंदले,नस्सिम शेख,परविन शेख यांनी विशेष प्रयत्न केले.

याच शिबिराच्या माध्यमातून जखणगांव उपक्रेंद्रांतर्गत येणार्या जखणगांव, हिंगणगाव व हमीदपुर येथील १८ वर्षांवरील सर्व कुमारिकांची सोनोग्राफी व रक्त चाचण्यासह संपूर्ण आरोग्य तपासणी मोफत करण्यात येणार आहे.