Type Here to Get Search Results !

अहिल्यानगर - पाणी योजनांच्या कामांचे केंद्र सरकारच्या समितीकडे थर्ड पार्टी ऑडीट करण्याची मागणी - खा. नीलेश लंके

 जल जीवनच्या कामांचे थर्ड पार्टी ऑडीट करा 


खासदार नीलेश लंके यांची मागणी 


जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील यांची दिल्लीत भेट 



नगर  : प्रतिनिधी 


    अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघात जल जीवन मिशन योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या पाणी योजनांच्या कामांचे केंद्र सरकारच्या समितीकडे थर्ड पार्टी ऑडीट करण्याची मागणी खासदार नीलेश लंके यांनी जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील यांची शुक्रवारी नवी दिल्लीत भेट घेऊन मागणी केली. तसे पत्रही खा. लंके यांनी मंत्री पाटील यांना सुपूर्द केले. 

      मंत्री पाटील यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, जनजीवन मिशन योजनेअंतर्गत मंजुर ७९ योजनांपैकी नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील दहा योजना पुर्ण झाल्या आहेत. या कामांमध्ये मोठया प्रमाणावर भ्रष्टाचार झालेला आहे. तशा तक्रारीही आपणाकडे प्राप्त झाल्या आहेत. श्रीगोंदे तालुक्यातील अजनुज, आनंदनगर व अन्य आठ योजनांचे केंद्रीय समिती मार्फत ऑडीट केल्यास या कामांमधील भ्रष्टाचार उघड होणार आहे. मंत्री पाटील यांनी लवकरात लवकर या योजनांचे ऑडीट करावे अशी मागणी खा. लंके यांनी निवेदनात केली आहे. 


▪चौकट


जिल्हा परिषदेचा प्रतिसाद नाही 


यासंदर्भात जल जीवन मिशन योजनेअंतर्गत राबविण्यात आलेल्या योजनांच्या कामांचे केंद्रीय समिती मार्फत ऑडीट करण्यासंदर्भात आपण जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा  विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे दोन ते तीन वेळा पत्रव्यवहार करण्यात आला, मात्र त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. 


खा. नीलेश लंके 

लोकसभा सदस्य