Type Here to Get Search Results !

राहुरी - ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडून ९ वर्षीय मुलगी ठार.

 ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडून ९ वर्षीय मुलगी ठार.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


राहुरी तालुक्यातील संक्रापूर येथील अनुष्का सोमनाथ पांढरे, वय ९ वर्षे, या चिमुकलीचा मका  ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.


या घटनेची माहिती मिळताच गावकरी जमा होऊन काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शाळकरी मुलीचा दुर्देवी मृत्यू झाल्याने नागरिक संतप्त झाले होते.


 सध्या अनेक ठिकाणी ऊस व मका कुट्टी डबल ट्रॉली ट्रॅक्टरच्या माध्यमातून वाहतूक होत असल्याने अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडतात. आरटीओने लक्ष घालून अशा दुहेरी ट्राॅलीच्या ट्रॅक्टरवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.