प्रजासत्ताकाचा अमृत महोत्सव हंगा गावात साजरा होणार - राजेंद्र करंदीकर
पारनेर - भारतीय संविधान व प्रजासत्ताकाला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने पारनेर तालुक्यात संविधान व प्रजासत्ताकाचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. गेल्या वर्षभरापेक्षा जास्त काळापासून लोकशाही व संविधानाबाबत जनजागृती अभियान राबविले जात आहे.विविध उपक्रम व प्रबोधनपर कार्यक्रमांद्वारे समाजात संविधानाबाबत व संविधानिक मुलभूत अधिकाराबाबत जागृती निर्माण करणे या उद्देशानेच सदर अमृत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.त्याअंतर्गत युनिटी ऑफ मुलनिवासी समाज व संविधान जनजागृती अभियान हंगा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि.२६ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता हंगा येथे सामाजिक सभागृहामधे "प्रजासत्ताक गौरव परिषद" आयोजित केली आहे, अशी माहिती अभियानाचे मुख्य प्रवर्तक राजेंद्र करंदीकर यांनी दिली.
परिषदेत "भारतीय संविधान व प्रजासत्ताकाच्या गौरवशाली ७५ वर्षांची फलनिष्पत्ती व देशातील आजची वर्तमान परिस्थिती" या विषयावर प्रबोधन होणार आहे. लोकसभा सदस्य खा.निलेशजी लंके कार्यक्रमास उपस्थित राहणार असुन परिषदेचे उद्घाटक छत्रपती क्रांती सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब मिसाळ पा.हे आहेत.त्याचप्रमाणे कार्यक्रमास ना.तहसीलदार गणेश आढारी, पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे व समीर बारवकर, खादी ग्रामोद्योगचे हसन राजे,हंग्याचे मा.सरपंच राजेंद्र शिंदे,ॲड.बाळासाहेब सोनवणे,ॲड.रामदास शिंदे व माही सुर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.तर कार्यक्रमाची अध्यक्षता बामसेफ तथा युनिटी ऑफ मुलनिवासी समाज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.कमलाकांत काळे हे करणार आहेत.
सदर कार्यक्रमास प्राध्यापक,वकील, डॉक्टर, इंजिनिअर,शिक्षक आदी बुद्धिजीवी वर्गाने, तथा लोकशाही व संविधान प्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बाळासाहेब पातारे,महेंद्र रोकडे, सुरेश रोकडे, मनोज सुर्यवंशी, रावसाहेब सुर्यवंशी,मधुकर पठारे, दादाभाऊ पटेकर,देवेंद्र जाधव, भगवान गायकवाड, हिरामण सोनवणे,बाबाजी वाघमारे,वसंत कसबे, संदीप वाघमारे, चंद्रकांत शिंदे, दत्तात्रय शिंदे, संतोष वाबळे,देवीदास पाडळे, वसंत जाधव,अशोक जाधव,शरद नगरे,सौरव बोरुडे, संतोष विधाटे, निखिल गायकवाड,गोरख सुर्यवंशी,मृणाली सुर्यवंशी, युवराज राक्षे, प्रदीप काळे,शब्बीर शेख, दादाभाऊ जाधव,संघराज सोनवणे आदींनी केले आहे.
