Type Here to Get Search Results !

राहुरी - टेपमध्ये गाणे लावणे नाही म्हणून ट्रॅक्टर चालकास मारहाण.

 टेपमध्ये गाणे लावणे नाही म्हणून ट्रॅक्टर चालकास मारहाण.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकास रस्त्यावर अडवून ट्रॅक्टरच्या टेपमध्ये गाणे लाव असे म्हणुन लाथा बूक्क्यांनी व दगडाने मारहाण करण्यात आली. ही घटना दि. २२ जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास घडली. 


योगेश नानासाहेब वाघ, वय ३२ वर्षे, रा. जातप, ता. राहुरी, यांनी राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, योगेश वाघ हे संगमनेर कारखाना येथे ऊस खाली करुन परत लोणी कोल्हार मार्गे हायवे रोडने आले. पुढे हायवे रोडवरील हॉटेल समाधान शेजारुन देवळाली प्रवरा कडे जाणारे रोडने दि. २२ जानेवारी २०२५ रोजी पहाटे १ वाजेच्या सुमारास इनाम वस्ती जवळील चौफल्यावर आले.


तेथे तिन ते चार अनोळखी मुले बसली होती. त्यांनी योगेश वाघ यांना थांबविले तुझ्या ट्रॅक्टरमधील टेपवर गाणे लाव असे म्हणाले. तेव्हा योगेश वाघ त्यांना म्हणाले की, माझे ट्रॅक्टरमध्ये टेप नाही, असे म्हणालेचा त्यांना राग आला.


तेव्हा त्या मद्यधुंद अवस्थेत असलेल्या आरोपींनी योगेश वाघ यांना शिवीगाळ करुन लाथा बूक्क्यांनी व दगडाने मारहाण केली. घटनेनंतर योगेश नानासाहेब वाघ यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्या फिर्यादीवरून अज्ञात चार जणांवर गुन्हा रजि. नं. ४०/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ११५ (२), ११८ (१), १२५, ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.