Type Here to Get Search Results !

राहुरी - पत्नीच्या नातेवाईकांकडून पतीच्या नातेवाईकांना लाथा बूक्क्यांनी मारहाण.

 पत्नीच्या नातेवाईकांकडून पतीच्या नातेवाईकांना लाथा बूक्क्यांनी मारहाण.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


पती पत्नीचे वाद मिटवण्यासाठी बैठक सुरु असताना पत्नीच्या माहेरकडील लोकांनी पतीच्या नातेवाईकांना शिवीगाळ दमदाटी करुन लाथा बूक्क्यांनी मारहाण केल्याची घटना दि. १८ फेब्रुवारी रोजी राहुरी तालुक्यातील महाडुक सेंटर येथे घडली. 


सोमनाथ बाबुराव बनकर, वय ६८ वर्षे, रा. महाडुक सेंटर, मुसळवाडी शिवार, ता. राहुरी, यांनी राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, दि. १७ फेब्रुवारी २०२५ रोजी सोमनाथ बनकर यांचा मुलगा विजय व सुन श्वेता यांच्यात शेतात जाण्याच्या कारणावरुन किरकोळ वाद झाला होता. तेव्हा सुन श्वेता ही तिच्या मामा सोबत निघुन गेली होती. 


दि. १८ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजे दरम्यान सोमनाथ यांची सुन व तीचे माहेरकडील नातेवाईक सोमनाथ बनकर यांच्या घरी आले. तेव्हा त्यांचे बोलणे सुरु असताना श्वेता बनकर हिच्या माहेरकडील नातेवाईकांनी सोमनाथ व त्यांच्या घरातील इतर लोकांना शिवीगाळ, दमदाटी करुन लाथा बूक्क्यांनी मारहाण केली. तसेच आम्ही मुलीला येथे नांदविणार नाहीत, आम्ही लग्नात दिलेले भांडे बाहेर काढा. आम्ही ते पुढच्या वेळेस घेवुन जाउ, तुम्ही ते दिले नाहीतर तुमचे एक एकाचे मुडदे पाडु, अशी धमकी दिली आहे.


सोमनाथ बाबुराव बनकर यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात आरोपी श्वेता विजय बनकर, श्रीचंद भाउलाल पवार, मिनाबाई श्रीचंद पवार, दिपक श्रीचंद पवार, सर्व रा. बिडकीन, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर, तसेच आनंद वाघ, आनंद वाघची पत्नी (नाव माहीत नाही) दोघे रा. कारेगाव, ता. श्रीरामपुर, जि. अहील्यानगर यांच्यावर गुन्हा रजि. नं. १३३/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ११५ (२), १८९ (२), १९०, १९१ (२), ३५१ (२), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.