Type Here to Get Search Results !

राहुरी - सायबर विश्वात वावरताना घ्यावयाची काळजी याबाबत डिवायएसपी शिवपूजे यांचे मार्गदर्शन.

 



सायबर विश्वात वावरताना घ्यावयाची काळजी याबाबत डिवायएसपी शिवपूजे यांचे मार्गदर्शन.


राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


मुख्यमंत्री यांच्या शंभर दिवसांच्या उद्दिष्ट पूर्तीच्या अनुषंगाने आज दि. २२ फेब्रुवारी रोजी राहुरी तालुक्यातील सुमारे ३२ शाळांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे उपविभागीय पोलीस अधिकारी डाॅ. बसवराज शिवपुजे यांनी 'गुड टच बॅड टच ' तसेच 'सायबर विश्वात वावरताना घ्यावयाची काळजी ' याबाबत तालुक्यातील सुमारे ३२ शाळांमधील ७ हजार ५०० विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.


सदर मार्गदर्शन हे राहुरी फॅक्टरी येथील प्रसाद ग्रामीण शिक्षण संस्था अंतर्गत बाळासाहेब वाणी शैक्षणिक संकुल गणेगाव मधून करण्यात आले. त्यावेळी स्कूलचे संचालक वाणी तसेच तालुका शिक्षणाधिकारी श्री तुंबारे व तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख, डॉ. बसवराज शिवपुजे पोलीस उपाधीक्षक श्रीरामपूर विभाग श्रीरामपूर, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे पोलीस ठाणे राहुरी, पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक शिंदे गोपनीय शाखा राहुरी हे कार्यक्रमाला उपस्थित होते. तालुक्यातील शक्तिशाळा ऑनलाईन उपस्थित होत्या.