Type Here to Get Search Results !

राहुरी - एम. पी. एस. सी. उत्तीर्ण झालेले राहुल नजन व निता चोपडे यांचा ग्रामस्थांकडून सत्कार.


 


एम. पी. एस. सी. उत्तीर्ण झालेले राहुल नजन व निता चोपडे यांचा ग्रामस्थांकडून सत्कार.


राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.*


राहुरी खुर्द येथील राहुल नवनाथ नजन व नीता बाळासाहेब चोपडे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एप्रील २०२३ मध्ये घेतेलेल्या मंत्रालय महसूल सहायक पदी निवड झाल्या बद्दल ग्रामस्थां तर्फे ग्रामपंचायत कार्यालया समोर सत्कार करण्यात आला.


प्रास्ताविक करताना डॉ. तनपुरे कारखाण्याचे माजी संचालक नंदकुमार डोळस यांनी राहुल नजन यांच्या आई वडीलांनी अतिशय खडतर परिस्थितीचा सामना करून दोन्ही मुलांचे शिक्षण केले. त्यामुळे राहुल याने आई वडीलांनी घेतलेल्या कष्टाचे रात्र दिवस अभ्यास करून लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन करून खऱ्या अर्थाने चीज केल्याचे सांगितले.


सत्कारास विशेष अतिथी म्हणून उपस्थीत राहिलेले पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगात उत्तीर्ण होत असलेले बरेचसे विद्यार्थी हे इंजिनियरींग, बी. एस्सी, एम एस्सी, अशा पदव्या घेतलेले असताना राहुल याने बी. ए. शिक्षण घेऊन लोकसेवा परीक्षा उत्तीर्ण होणे ही अभिमानाची गोष्ट असल्याचे सांगून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 


निता बाळासाहेब चोपडे ही प्रगतीशील शेतकरी बाळासाहेब चोपडे यांची कन्या असून तीने डी एड नंतर एम. ए. पदवी घेऊन लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळविले आहे. आयुब पठाण यांनी त्यांच्या यशा बद्दल ग्रामस्थां तर्फे शुभेच्छा व्यक्त केल्या. राजू भांड यांनी आभार मानले. 


या कार्यक्रमास राहुरी खुर्दच्या सरपंच मालतीताई साखरे तंटामुक्तीचे अध्यक्ष निसारभाई शेख, कारखाण्याचे संचालक नंदकुमार डोळस, मच्छींद्र पाटोळे, विजय आळपे, ज्ञानदेव तोडमल, अय्युब पठाण, गणेश शेटे, ग्रामपंचायत सदस्य नरेंद्र शेटे, अमोल डोळस, राम तोडमल, राहुल पाटोळे, अशोकराव तोडमल, अंबादास साखरे, अफजल पठाण, गणेश भांड, अप्पासाहेब चोपडे, गोपीनाथ साळवे, भरत नजन, अक्षय पाटोळे, सुनिल नजन, साईनाथ भिसे, नवनाथ रूपनर, संजय नजन, पत्रकार भिमराज गुंड, अशोक मंडलीक, रमेश खेमनर, उमेश बाचकर यासह ग्रामस्थ महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.