Type Here to Get Search Results !

सिन्नर - कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत वाढ.







कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत वाढ.

 सिन्नर( प्रतिनिधी) सुरेश इंगळे.

 सिन्नर- नाशिक जिल्हा पालकमंत्री पदाचा टिळा अजूनही सुटलेला नसताना ,कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचे नाव पालकमंत्री पदासाठी चर्चेत होते परंतु दादा भुसे आणी गिरीश महाजन यांच्यामध्ये पालकमंत्री पदासाठी रस्सीखेच असल्याची चर्चा आहे दरम्यान सदनिका घोटाळा प्रकरणामुळे माणिकराव कोकाटे यांचे नाव नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी मागे पडले आहे. त्यामुळे आता नाशिकच्या पालकमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबाबत उत्सुकता आहे. मुख्यमंत्री कोट्यातून दिल्या जाणाऱ्या सदनिका या बनावट दस्तऐवज तयार करून लाटल्या प्रकरणात कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे व त्यांची भाऊ विजय कोकाटे यांना प्रत्येकी दोन वर्षाचा कारावास आणि 50 हजार रुपये दंडाची शिक्षा नाशिक जिल्हा न्यायालयाने गुरुवारी सुनावली होती, माणिकराव कोकाटे यांनी अवघ्या दोन तासात जामीन मंजूर करून घेतला. दरम्यान कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे त्यांना सुनावलेल्या शिक्षेला आज न्यायालयात आव्हान देणार आहे कोकाटे यांच्याकडून अपील करण्यासाठी अर्ज दाखल करण्यात येणार आहे व कोकाटे यांना अपील करण्यासाठी 30 दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी यांच्या निर्णयाच्या विरोधात कोकाटे सत्र न्यायालयात अर्ज दाखल करणार आहेत. सुनावण्यात आलेल्या शिक्षेला स्थगिती मिळावी यासाठी कोकाटे यांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र माणिकराव कोकाटे यांना शिक्षा सुनावताना त्यांच्या बंदुकीच्या परवान्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे. त्यामुळे माणिकराव कोकाटे हे अडचणीत सापडले असून त्यांचा बंदुकीचा परवाना रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.